शिरूर दिनांक प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा शिरूर तालुक्यातील ८७ शाळेचा निकाल ९७.४३ टक्के लागला असल्याची माहिती शिरूर तालुका गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर व तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील ३३ शाळा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २0२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्याचा दहावीचा एकूण निकाल ९७.४३ टक्के लागला असून या परीक्षेत ८७ माध्यमिक शाळेचे एकूण ६५४३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६३७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातून विशेष श्रेणीत २३०५, प्रथम श्रेणीत २३३९, आणि द्वितीय श्रेणीत १४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर आणि शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या शाळा पुढीलप्रमाणे : आर एम धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे,ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखई, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय करडे, श्रीगुरुदेव दत्त विद्यालय संविदणे, न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव, श्री नागेश्वर विद्यालय निमोणे, श्री महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे, श्री सद्गुरु कृपा विद्यालय नागरगाव, श्री गुरुनाथ विद्यालय वडनेर खुर्द, कालिकामाता माध्यमिक विद्यालय वाघाळे, श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी, न्यू इंग्लिश स्कूल उरळगाव, न्यू इंग्लिश स्कूल पिंपळसूटी, मा. बापूसाहेब गावडे विद्यालय म्हसे बुद्रुक, हनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी,आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर, आदर्श विद्यालय वरुडे, जय मल्हार माध्यमिक विद्यालय चिंचोली मोराची, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय चिंचणी, एकता विद्यालय करंजावणे, सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक विद्यालय कासारी, फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा, शिवाजी विद्यालय गोलेगाव, श्री पद्मिनी जैन इंग्लिश स्कूल पाबळ, विजयामाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर,
आर एम धारिवाल सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल कोंढापुरी,
अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर तळेगाव ढमढेरे, डी इ एस इंग्लिश मीडियम स्कूल बाबुराव नगर. अक्षरनंदन गुरुकुल इंग्लिश मीडियम रांजणगाव गणपती या ३३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
अन्य शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :- विद्याधाम प्रशाला शिरूर (९९.७८), भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ (९६.१७), स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (९७.१४), मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती (९५.२३), श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (९९.५०), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (९६.६१), छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई (९५.५८), न्यू इंग्लिश स्कूल मलठण(९१.४०), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव (९३.०६), सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर (९४.७९), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (९६.८३), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (९६.२४), विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई (९३.६७), न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई (९३.३३), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (९९.०३), मा.बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी (९५.९६), न्यू इंग्लिश स्कूल धामारी (९७.६४), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (९७.१०), श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी (९६.७२), विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी (९७.५६), जय मल्हार हायस्कूल जांबुत (९९.१६), स्वातंत्र्य सेनानी कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (९९.१८), विद्या विकास मंदिर करंदी (९७.४५), माध्यमिक विद्यालय सणसवाडी (९९.१३), न्यू इंग्लिश स्कूल अण्णापूर (९३.१०), अभिनव विद्यालय सरदवाडी (९८.५७), कै.के.पी.गदादे विद्यालय तांदळी (९७.३६), शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक (९८.२७), श्री संतराज महाराज विद्यालय रांजणगाव सांडस (९६.९६), श्री दामोदर ताटे विद्यालय कारेगाव (९३.२६), महाराज सयाजी गायकवाड विद्यालय पिंपळे जगताप (९०.४७), छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक (९८.४६), बापूसाहेब गावडे विद्यालय चांडोह (९६.१५), श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा (९८.३३), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (९७.५८), पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभूळसर बुद्रुक (९४.४४), श्री घनोबा माध्यमिक विद्यालय धानोरे (९६.६६), आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोकसांगवी (९७.९५), श्री दत्त माध्यमिक विद्यालय गुणाट (८०), श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर (९२.३०), रसिकलाल धारिवाल माध्यमिक विद्यालय गणेगाव (९०), मा. पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद (८६.६६), कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखई (९८.७९), जीवन विकास माध्यमिक विद्यालय शिरूर (९७.७२), जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर (९५), बालाजी माध्यमिक विद्यालय शिरूर (९६.५५), महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती (९७.२२), अक्षरधन गुरुकुल स्कूल कारेगाव (९७.१४), कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव (९६.८७).