दोन बेपत्ता युवतींचा दोन महिन्यांपासून तपास शून्यशिक्रापुर पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संशय

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी अल्पवयीन युवती बेपत्ता होण्याचा घटना घडत असताना सध्या दोन महिन्यांपूर्वी दोन अल्पवयीन युवती बेपत्ता झाल्यानंतर अपहरण बाबत गुन्हे दाखल होऊन देखील दोन महिन्यांपाडून दोन्ही युवतींचा तपास शून्य असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संशय व्यक्त केला जात आहे.

                      शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतून निमगाव म्हाळुंगी येथील एक अल्पवयीन युवती २४ मार्च रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली तर २७ मार्च रोजी कोंढापुरी येथील देखील एक युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली त्याबाबत दोन्ही युवतींच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन येथे युवतींचे अपहरण झाल्याबाबत गुन्हे दाखल केले मात्र दोन अडीच महिने उलटून गेले तरी अद्याप पर्यंत एकाही युवतीचा शोध पोलिसांना लागत नाही तर या युवतींच्या अपहरण बाबत काही युवकांवर गुन्हे दाखल झालेले असताना देखील पोलीस आरोपींचा शोध घेण्यात असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे, मग अनेकदा चोरी, खून, दरोडे सारख्या गुन्ह्यातील आरोपींबाबत काहीही माहिती नसताना पोलिसांचा त्यांचा शोध लागतो आणि पोलीस अधिकारी हे वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेतात मग या गुन्ह्यातील आरोपींबाबत माहिती असताना देखील पोलिसांना त्यांचा शोध का लागत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर याबाबत अल्पवयीन युवतींच्या अपहरण बाबतचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार व पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांच्याशी संपर्क साधला असता या गुन्ह्यातील आरोपींसह अल्पवयीन युवतींचा शोध सुरु असून तपास चालू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार व पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी सांगितले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!