केंदुर येथील संजय जोहरेंना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार

9 Star News
0
संजय जोहरेंना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार
शिरूर 
( प्रतिनिधी ) केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील कलाशिक्षक संजय जोहरे यांना शिक्षक फाऊंडे शन संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
                                 केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील कलाशिक्षक संजय जोहरे यांच्या माध्यमातून शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला, तर संजय जोहरे यांनी केंदूरचे सुपूत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विदयार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम राबवले त्यांच्या कार्याची दखल घेत, संजय जोहरे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार २०२४ हा अभिनेत्री किशोरी शहाणे, सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊत व महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दिपक चामे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे उपाध्यक्ष मेघाराणी जोशी, सचिव सतिश कोळी, सहसचिव राजश्री पाटील, राज्यसमन्वयक पंकजकुमार पालीवाल, चंद्रकांत गोरगिले, मनिषा पवाळ, संध्या वाळुंज, भगवान जायभाये, गिरीश दारुंटे, रंगनाथ सगर, पांडुरंग यलमट्टे, श्रीकांत शेंडगे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ, काळानुरुप होणारे बदल स्विकारण्याची क्षमता केवळ शिक्षकात असून प्रत्येक शिक्षकाने आपापले ब्रँड व्हायला हवे असे प्रतिपादन अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी केले आहे. तर संजय जोहरे यांनी केलेल्या सामाजिक जागृतीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे विदयालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगीतले.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथील संजय जोहरे यांना पुरस्कार प्रदान करताना पदाधिकारी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!