शिक्रापुरात श्वानाच्या आठ पिल्लांची मृत्युच्या दाढेतून सुटका

9 Star News
0
शिक्रापुरात श्वानाच्या आठ पिल्लांची मृत्युच्या धाडेतून सुटका
निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांची धाडसी कामगिर
शिरूर 
(  प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे श्वानाने जन्म दिलेल्या पिल्लांच्या जवळ अतिविषारी घोणस जातीचा साप आला आणि एका पिल्लाला चावा घेतला मात्र यावेळी श्वानाच्या आठ पिल्लांची मृत्युच्या धाडेतून सुटका करत सापाला जेरबंद करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले आहे. 
                        शिक्रापूर ता. शिरुर येथील अजिंक्यतारा हॉटेल लगत एका श्वानाने नऊ गोंडस पिल्लांना जन्म दिलेला असून नुकतेच येथे अतिविषारी घोणस जातीचा साप आल्याने सापाने एका पि पिल्लाला चावा घेतला, याबाबतची माहिती शिरुर केसरी पैलवान गणेश सासवडे यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली असता शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ यांनी तेथे धाव घेत श्वानाच्या आठ पिल्लांला सुखरूप बाजूला घेत तेथील घोणस शिताफीने सापाला जेरबंद केले, तर काही वेळातच श्वानाच्या पिल्लांची आई पिल्लांच्या जवळ येऊन आठ पिल्लांना सुखरूप सुरक्षितस्थळी हलवले मात्र सदर दुर्घनेत एका पिल्लाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली तर सर्पमित्रांमुळे श्वानाची आठ पिल्ले मृत्युच्या धाडेतून बाहेर आल्याने सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक केले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे सर्पमित्रांनी मृत्युच्या धाडेतून बाहेर काढलेली श्वानाची पिल्ले व घोणस साप.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!