मलठण ता. शिरूर येथील शिंदेवाडी येथे बैलगाडा शर्यत घाटातच वडिलोपार्जित जमिनी वाटपाच्या कारणावरून चुलता व चुलत भावाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहानीत गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षे तरुणाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोघाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे
संजय रखमा शिंदे (वय ३५, रा. रावडेवाडी, ता. शिरूर जि. पुणे) या तरुणाच या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
भानुदास ज्ञानोबा शिंदे , ज्ञानोबा गोविंद शिंदे (दोघे रा. शिंदेवाडी, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
गंगुबाई रखमा शिंदे ( रा. रावडेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या हाणामारी बाबत भांडणामध्ये बैलगाडा शर्यतीचा कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटी कडून सांगण्यात आले.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 28 एप्रिल रविवारी रोजी मलठण येथील खंडोबा देवाची यात्रा होती या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरू असताना शिंदेवाडी बैलगाडा शर्यत घाटावर वडीलोपार्जित जमीन वाटपाचे कारणावरून भानुदास ज्ञानोबा शिंदे याने लाकडी दांडयाने चुलत भाऊ संजय यास "तु लई माजलाय, आम्हाला जमीन वाटुन मागतो काय, तुला आता जिवंतच सोडत नाही, तुला आता खल्लासच करतो" असे म्हणुन 4 ते 5 वेळा लाकडी दांडक्याने संजय याच्या डोक्यात मारून चुलता ज्ञानोबा गोविंद शिंदे याने त्याला "आता याला मारून टाकतो" असे म्हणुन लाथा बुक्याने मारहाण करून पुतण्या संजय यास गंभीर जखमी केले त्याला शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान रात्री दहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या खुन प्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल झाला असून , पुढील तपास शिरुर पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.
मयत संजय व त्याचे चुलते ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यामध्ये शिंदेवाडी मालथान येथील 14 एकर जमीन वाटपावरून वाद होता. संजय हा जमीन वाटून मागत असल्याने चुलता व चुलत भावाने त्याचा खून केला आहे.