शिरुर मध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
शिरुर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे  जनसंपर्क कार्यालयामुळें  सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम या कार्यालयातुन होइल तसेच पक्षाची मोट बांधण्याचे काम पाडव्याच्या शुभ मुहर्तावर चांगल्या प्रकारे होइल तसेच अनेक वर्षांचे शिवसैनिकांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी व्यक्त केले .

शिरुर शहरातील बाजार समितीच्या नविन व्यापारी संकुलात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिरुर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खांडेभराड यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते .
या वेळी शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार ,तालुका प्रमुख पोपटराव शेलार ,शहरप्रमुख संजय देशमुख ,राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल चव्हाण , उपशहरप्रमुख महादेव कडाळे ,उपतालुका प्रमुख राहुल शिंदे ,अनिल कर्पे ,गणेश राउत ,विनोद सोनवणे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते .
या वेळी आमदार ॲड अशोक पवार म्हणाले कि शिवसेनेचा शिवसैनिक हा निष्ठावंत असतो शिवसैनिकाला निष्ठे पुढे काही दिसत नाही या निष्ठेचे फळ म्हणुन हे कार्यालय उभारले गेले असुन या संपर्क कार्यालयातुन अनेकांना न्याय मिळेल असा विश्वास या वेळी पवार यांनी व्यक्त केला .
तालुका प्रमुख पोपटराव शेलार म्हणाले कि शिवसैनिकांची अनेक वर्षाची इच्छा बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मला संधी मिळाली व पुर्ण झाली असुन भविष्यात सर्व शिवसैनिकांनची मोट बांधुन संघटना वाढविण्यासाठी या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे शेलार या वेळी म्हणाले .
स्वागत व आभार शहरप्रमुख संजय देशमुख यांनी केले .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!