या शिबिरात १५० महिलांनी सहभाग घेतला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील बायो केमेस्ट्री विभागाच्या समन्वयक प्रा.डॉ. किरण फुलझेले , प्रा. डॉ. कीर्ती लिमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांच्या टीमने तपासणीचे नियोजन केले. शिबिराचे उद्घघाटन नोटरी सीमा काशीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात महिलांचे बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, रक्तातील शर्करा आदी तपासणी करण्यात आली. डॉ. सुनिता पोटे व डॉ. सौ. मदने यांनी तपासणी नंतर मोफत वैद्यकीय सल्ला दिला. या प्रसंगी शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य सुधाकर पोटे, विजयकुमार कुलकर्णी, गणेश मराठे, शाळेचे प्राचार्य डॉ .समीर ओंकार आदी उपस्थित होते.
डेक्कन स्कुल मध्ये महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
एप्रिल ११, २०२४
0
डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
Tags