शिरूर
( प्रतिनिधी ) मुखई ता. शिरुर येथे प्लॉटिंगसाठी घेतलेल्या जमिनीत अडचणी निर्माण करुन जमीन विक्री करणाऱ्यांचा मुलगा प्लॉटिंग डेव्हलप करणाऱ्या इसमाकडे वारंवार खंडणी मागून ॲट्रॉसिटीत अडकवण्याची धमकी दिल्याची तर प्लॉटिंग डेव्हलप करणाऱ्या इसमाने जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत परस्परविरोधी तक्रारी पोलीस स्टेशन येथे आल्याने पोलिसांनी तेजस बाबुराव मोहिते याच्या विरुद्ध खंडणी तर महेश पोपट शिनगारे याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुखई ता. शिरुर येथील मोहिते कुटुंबियांची जमीन प्रभाकर भोसले यांनी प्लॉटिंग साठी घेतलेली असून सदर जमीन महेश शिनगारे हे डेव्हलप करत असून सदर जमिनीची मोजणी सह आदी कामे सुरु असताना मोहिते कुटुंबातील मुलगा तेजस मोहिते शिनगारे यांना फोन करुन तुम्हाला कामात अडचणी नको असतील तर दोन लाख रुपये देण्याची मागणी केल्याने शिनगारे यांनी त्याला वीस हजार रुपये फोन पे वर दिले त्यांनतर वारंवार तेजस त्रास देत राहिल्याने पुन्हा त्याला पैसे दिले मात्र तेजस याने काही वेळा शिनगारे यांना अडवून धमकी देत महिन्याला दहा हजार डे नाहीतर तुला ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी देखील दिली त्याबाबत महेश शिनगारे यांनी प्रभाकर भोसलेंना सांगितले असता त्यांनी तेजसच्या वडिलांना याबाबत माहिती दिली मात्र तेजस पुन्हा शिनगारे याला भेटून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला तर तेजस मोहिते याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाकर भोसले यांनी सदर जागेत शेड मारल्याने त्याबाबत महसूल विभागात तक्रारी दिलेल्या आहेत मात्र तेजस सदर जागेमध्ये गेलेला असताना महेश शिनगारे दारू पीत बसलेला असताना त्याने तू प्रभाकर भोसलेंच्या नादी लागू नको परिणाम वाईट होईल असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे, याबाबत तेजस बाबुराव मोहिते वय ३० वर्षे रा. संगमवाडी रामनगर खडकी पुणे व महेश पोपट शिनगारे वय ३५ वर्षे रा. चाकण ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तेजस बाबुराव मोहिते याच्या विरुद्ध खंडणी तर महेश पोपट शिनगारे याच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.