शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे मोठ्या गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन विक्री केली जात असलेल्या गॅसच्या दुकानांत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक करत गॅसच्या लहान मोठ्या टाक्या जप्त करुन दौलत नरसिंग इंचरे व शिवराज सनमुख खानापुरे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पाबळ चौक परिसरात काही इसम गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशी व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळाली त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तळपे, पोलीस शिपाई प्रकाश झेंडे यांनी शिक्रापूर येथे येत सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी साई गॅस कनेक्शन व रिपेअरिंग दुकानात जाऊन छापा टाकला असता शिवराज खानापुरे तर ओम गॅस एजन्सी या दुकानात दौलत इंचरे हा बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने लहान गॅस टाक्यांमध्ये ट्रान्सफर करुन विक्री करताना मिळून आला दरम्यान सदर पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील वजन काटे लहान मोठ्या गॅस सिलेंडर टाक्या तसेच रिफिलिंग पाईप व रेग्युलेटर जप्त करत दोघांना ताब्यात घेतले, याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तळपे व पोलीस शिपाई प्रकाश बाबासाहेब झेंडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी साई गॅस कनेक्शन व रिपेअरिंग दुकान चालक शिवराज सनमुख खानापुरे वय ३६ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे व ओम गॅस एजन्सी दुकान चालक दौलत नरसिंग इंचरे वय २५ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. लासवना ता. देवणी जि. लातूर या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व सोमनाथ कचरे हे करत आहे.