शिरूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच तापले असताना महाविकास आघाडीने डॉ. अमोल कोल्हे यांना तर महायुतीने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असताना वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केलेली होती, तर बारामती लोकसभेतून उमेदवार न देताना शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठींबा वंचितने दर्शवला होता, मात्र मंगलदास बांदल यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वंचितने बारामतीतून पाठींबा दर्शवलेल्या सुप्रिया सुळे यांना विरोध दर्शवला तसेच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाचे असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या, तर बांदल यांच्या उमेदवारी नंतर वंचित सह समविचारी संघटनांनी त्यांची बैठक आयोजित करत उमेदवाराबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले, मात्र आज वंचितच्या वतीने बांदल यांनी विरोधी पक्षाशी केलेली जवळीक व बारामती लोकसभेच्या उमेदवाराला दिलेल्या पाठींब्याला दाखवलेला विरोध याचे ठपके ठेवत मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करत असल्याचे जाहीर केले असल्याने बांदल आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र चौकट १ –
वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी रद्द झाल्याबाबत मला सोशल मीडियातून समजले, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मला काहीही सांगितले नाही, तसेच सध्या माझी वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असून उद्या मी स्वतः मेळावा देखील ठेवला आहे, वंचितच्या अधिकृत पोर्टलवर उमेदवारी रद्दचे जाहीर केले असले तरी अजून मला वंचित पक्ष प्रमुखांनी काहीही सांगितले नसून लोकसभा लढवण्यावर मी ठाम असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
सोबत – मंगलदास बांदल यांचा फोटो.