उन्हाचा पारा ४२ डिग्रीवर पोहचला असुन, त्या पासुन डाळीब फळाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉन कापडाचे सुरक्षा कवच ( क्रॉप कव्हर ) आच्छादन डाळीब बागेवर घातले आहे .

9 Star News
0
शिरूर दिनाक प्रतिनिधी 
उन्हाचा पारा ४२ डिग्रीवर पोहचला असुन, त्या पासुन डाळीब फळाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉन कापडाचे सुरक्षा कवच ( क्रॉप कव्हर ) आच्छादन डाळीब बागेवर घातले आहे .

  डाळिंब पिकाला चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे शिरूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले आहेत .ऊस व कांदा पिकाला जोड पीक म्हणून शेतकरी डाळिंबाची लागवड करतात .शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात माळरानावरील हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत .त्यामधून अनेक शेतकऱ्यांना समृद्धी येत झोपडीची जागा आता बंगल्यांनी घेतली आहे . एकट्या टाकळी हाजी गावामध्ये यावर्षी सुमारे दीड ते दोन लाख रोपांची लागवड झाली आहे . तर जुन्या बागा ही मोठ्या प्रमाणात आहेत .दोन वर्षांपूर्वी तेल्या व मर रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जुन्या भागा काढून टाकल्या .सध्या सुमारे हजार हेक्टर वर डाळिंबाची पिके जोमात असून त्यांना चांगले दर्जेदार फळे आलेले आहेत .डिसेंबर मध्ये झालेल्या गारपीट व वादळामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,तरीसुद्धा शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत घेऊन डाळिंब बागा चांगल्या फुलविल्या आहेत .सध्या डाळिंब फळे चांगले असून या फळाचे संरक्षण होण्यासाठी विविध कीटक व बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली जात आहे .मात्र सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून शिरूर तालुक्याचे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला डाळिंब फळास उन्हाचे चटके बसुन डाग पडण्याची भीती वाटत आहे . फळ कितीही मोठे झाले पण त्यावर जर उन्हामुळे डाग आला तर किमंत मातीमोल मिळते . त्यामुळे डाळिंब पिका फळाचे उन्हापासुन संरक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे . त्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉनचे कापड खरेदी केले असून हे कापड संपूर्ण बागेवर झाडाच्या वर दोन ते तीन फूट बांधून त्याला बांबूने आधार दिला आहे . कापड, बाबु, मजुरी या साठी एकरी ४० हजार रुपये खर्च होत आहे .या परिसरातील बागा सध्या सफेद कापडाने आच्छादल्या असल्यामुळे सर्व बागा पांढरा शुभ्र दिसत आहेत .यावर्षी निसर्गाचे कोणते संकट न आल्यास या परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होणार असल्याने शेतकरी ही मोठ्या आशेने खर्च करून डाळिंबाला जिवापाड जपत असून , सुरक्षेसाठी परिसरामधील बागेसाठी कोट्यावधी रुपयाचा आच्छादनाचा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे .या भागातील डाळिंबाचा दर्जा उत्तम असून येथील येथील डाळिंबाला निर्यातीसाठी मोठी मागणी असल्याने व्यापारी वर्ग या ठिकाणी येऊन डाळिंबाची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल आहे .त्यामुळे कांदा पिकाने धोका दिला आता डाळिंब तरी प्रप्रंच सावरेल अशी अशा शेतकरी वर्गाला आहे .

चौकट
उन्हाचे चटके डांळीब फळाला बसुन नये म्हणुन फळास क्रॉप कव्हरचे अच्छादन अंत्यत महत्वाचे असुन त्यामुळे फळाचा दर्जा उत्तम निघतो व बाजारही चांगला मिळतो .
       सिद्धेश ढवळे ( कृषी अधिकारी शिरूर )

चौकट
या पुर्वी कधीच डाळींबाला क्रॉप कव्हर वापरले नाही मात्र आता उन्हाची तिव्रता वाढत चालली असुन त्या पासुन वाचण्यासाठी क्रॉप कव्हरचा प्रयोग प्रथमच टाकळी हाजी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे .
देवीदास पवार ( डांळीब उत्पादक )

फोटो ओळी : टाकळी हाजी ता शिरूर येथे डांळीब बागेवर टाकलेला क्रॉप कव्हर दाखविताना शेतकरी देवीदास पवार

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!