शिरूर दिनांक
( प्रतिनिधी ) केंदूर ता. शिरुर येथे २०२१ मध्ये युवकाचा खून केल्याने खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर येताच सदर युवकाने कारमधून पिस्तुल घेऊन फिरत असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्याला कार व पिस्तुल सह अटक केले असून बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
केंदूर ता. शिरुर येथे बबलू उर्फ अभिजित पऱ्हाड याने डिसेंबर २०२१ मध्ये जुन्या वादातून पप्पू उर्फ निलेश विष्णू पऱ्हाड या युवकाचा खून केला होत्या, दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली तर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती, सध्या नुकतेच न्यायालयाने बबलू ला जामिनावर सोडले होते, मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर बबलू हा जवळ पिस्तुल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, पोलीस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, जयराज देवकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी केंदूर येथील पऱ्हाडवाडी येथे सापळा रचून बबलू उर्फ अभिजित याला त्याच्या जवळील कार व पिस्तुल सह जेरबंद केले, तर याबाबत पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड वय २५ वर्षे रा. पऱ्हाडवाडी केंदुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – केंदूर रा. शिरुर येथे पोलिसांनी पिस्तुलसह अटक केलेला युवक व कामगिरी करणारे पोलीस पथक.