भंगार गोळा करून त्यावर उपजीविका करणाऱ्या तरुणास 'गोळा केलेले भंगार आम्हालाच विकायचे', असा दम देत तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून भंगार माल घेणाऱ्याला व्यावसायिक याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी
         भंगार गोळा करून त्यावर उपजीविका करणाऱ्या तरुणास 'गोळा केलेले भंगार आम्हालाच विकायचे', असा दम देत तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून  भंगार माल घेणाऱ्याला व्यावसायिक याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
      
याबाबत किशोर शिवाजी काळे (वय २८, रा. गुजर मळा, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
        शिरूर पोलिसांनी साहिल उर्फ गुड्डू अल्ताफ काझी, मोईन उर्फ मोन्या अल्ताफ काझी (दोघे रा. सय्यदबाबा नगर, शिरूर) व फौजी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी काळे हा पुठ्ठा ,काचेच्या व प्लॅस्टिकच्या मोकळ्या बाटल्या गोळा करून त्यांची पाषाण मळा येथील रामनरेश रघुवीर निसार यांच्या गोदामावर विक्री करीत असतो. दरम्यान, 'हा भंगार माल इतरांना न विकता आमच्याकडेच विकायचा', असा दम काझी बंधूंनी काळे याला दिला होता. मात्र, 'जो जास्त भाव देईल त्यालाच भंगार माल विकणार', असे काळे म्हणाला होता.दरम्यान, बुधवारी दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी काळे यांनी जमा झालेला भंगार माल व पुठ्ठा रामनरेश यांना विकला व तो माल सचिन सोपाना ससाणे यांच्या मदतीने दोन छोट्या टेम्पोमधे भरून वजन करण्यासाठी राजनंदिनी वजन काट्यावर आणला. काळे, ससाणे व रामनरेश हे मालाचे वजन करीत असताना गुड्डू, मोन्या व फौजी तेथे आले आणि त्यांनी रामनरेश याला, 'शिरूरमधील पुठ्ठा व भंगार घ्यायचे नाही' असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी काळे व ससाणे यांनी, 'हा माल आमचा आहे, आम्ही तो विकतोय, तुम्ही त्याला का मारताय', अशी विचारणा केली असता काळे यांना ढकलून देत, जातीवाचक शिवीगाळ करित त्यांच्याकडे बघून धुंकत व शिवीगाळ करून ते तिघे निघून गेले. फिर्यादी नुसार याबाबत शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले पुढील तपास करीत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!