त्याच्या आगमनानिमित्त श्री.सकल जैन श्रावक संघ शिरूर यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली त्यात मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते. जैन धर्माच्या पताका व ध्वज अनेकांच्या हातात होते. भगवान महावीर यांचा जयघोष यावेळी करण्यात आला. महाश्रमणजी महाराज हे मुंबई येथील चातुर्मास संपवून सुरतला चालले आहेत. तर कमलमुनी महाराज हे इंदौर हून मुंबईला चालले आहेत. या दोन्ही धर्मगुरूचे शिरूर याठिकाणी एकत्रित आगमन झाले. त्यानिमित्ताने शिरूर शहरात नवीन शिरूर नगरपरिषदेचा समोर त्याचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार अशोक पवार आदी सहभागी झाले होते. संघपती भरत चोरडिया, माजी नगरसेवक विजय दुगड, अनिल बोरा, अभय बरमेचा , राजू कोठारी, निलेश संघवी, मंत्री वसंत गादिया, आनंद फुलफगर, अमित कोठारी, सुमतिलाल दुगड, राहूल बोथरा , संतोष पटवा ,राजेंद्र कर्नावट , कपिल बोरा , प्रशांत गादिया , जैन मंदिरचे अध्यक्ष सतीश धाडीवाल आदी यावेळी उपस्थित होते. शोभायात्रेची सांगता जैन स्थानकाजवळ झाली. त्यानंतर कमलमुनी महाराज व श्रमणजी महाराज यांची प्रवचने झाले. यावेळी कळवंतवाडी,ता.शिरूर येथील शांतीलाल प्रशांत बोरा यांनी दोन एकर जागा गोशाळेसाठी दिली. या कार्यक्रमाचा निमित्ताने प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल व आदित्य धारीवाल यांच्या परिवाराचा वतीने शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात गौतमी प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
युगप्रधान महातपस्वी आचार्य श्री.महाश्रमणजी महाराज व राष्ट्रसंत कमलमुनीजी महाराजाचे शिरूर शहरात उत्सहात स्वागत
एप्रिल ११, २०२४
0
शिरूर दिनांक ( वार्ताहर) युगप्रधान महातपस्वी आचार्य श्री.महाश्रमणजी महाराज व राष्ट्रसंत कमलमुनीजी महाराज यांचे शिरूर शहरात मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले.
Tags