त्यांना १२ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे . पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव औद्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार नोकरीच्या शोधात येत असतात. अशाच काही कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून काही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडुन विनामोबदला, मारहाण, दमदाटी करून काम करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. दि. ६ एप्रिल २०२४ रोजी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पो.कॉ. संतोष ढगे हे डायल 112 ड्युटीस हजर असतांना त्यांना कॉलरने फोन करुन "आम्हा कामगारांना कॉन्ट्रॅक्टरने कोंडून ठेवुन, मारहाण केली असुन आम्हाला पोलीस मदत पाहिजे असा कॉल केला . याबाबत राजेश ढगे यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना माहिती दिली . पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ पोलीस पथकास कॉलरला मदत करणे कामी पाठवुन दिले. पोलीस पथक एमआयडीसीतील एस.टि.सी . कंपनी" जवळ गेले व त्या ठिकाणावरुन ज्याने कॉल केला होता त्या कॉलर व त्याच्या मित्रांना घेवुन सरदवाडी येथे गेले त्याठिकाणी वेगवेगळ्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेल्या कामगारांची सुटका केली व या कामगारांना पोलीस स्टेशन येथे आणले . याप्रकरणी कामगार मिलिंद गुलाबराव लांडगे वय 29 वर्षे, मुळ रा. सिडको, आंबेडकरनगर, जळगाव रोड, छ. संभाजीनगर याने फिर्याद दिली आहे . सुनिल दिगंबर वाघळकर रा. सरदवाडी, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ रा. वांगदरी, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर (2) एस.टी.सी. कंपनीतील कंत्राटदार स्वप्निल लगड व त्याचे साथीदार यांनी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला असलेले कामगार लांडगे व त्यांचा मित्र असे दोघांना काम सोडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केलेचे कारणावरुन लांडगे व इतर कामगार यांना त्यांचेकडील कारमधुन जबरदस्तीने बसवुन निर्जन ठिकाणी घेवुन गेले व आरोपींनी त्यांचे कडील कंबरेचा बेल्ट काढुन बेल्ट तुटेपर्यंत कामगारांना पाठीवर, डोक्यात, हातावर मारहाण केली. तसेच त्यांचे छातीवर, तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. व हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे" असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यासंदर्भात सुनिल दिगंबर वाघळकर वय 30 वर्षे, रा. सदरवाडी, ता. शिरूर, जि. पुणे. , भारत गजानन मोहे वय 25 वर्षे, रा. बोरगाव मंजू, ता.जि. अकोला, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे. , स्वप्निल दादाभाऊ लगड वय 32 वर्षे, राहणार - ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे. यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांना दि. 12/04/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर अटक आरोपी यांनी फिर्यादी व इतर कामगारांना कोंडून ठेवुन त्यांच्याकडुन जबरदस्तीने काम करुन घेवुन त्यांना कामाचे पैसै न देता मारहाण केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले . ही कामगिरी पोलीस अधिक्षक पकंज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पो.कॉ. संतोष ढगे, पो.हवा. वैभव मोरे, पो.काँ. प्रतिक खरबस, पो.कॉ. अडसुळ, .पो.हवा. माऊली शिंदे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करत आहेत.
--्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्- चौकट
अशा प्रकारे कोणत्याही कामगारांकडुन जबरदस्तीने, विनामोबदला कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करुन घेत असल्यास अशा कामगारांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला निर्भयपणे संपर्क करावा. अशा प्रकारचे कृत्य करणा-या कोणत्याही कंपनीतील कॉन्ट्रॅक्टरची गय न करता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले .