शिरुर शहरासाठी भरघोस निधी आढळराव यांनी उपलब्ध करुन दिला असुन पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद

9 Star News
0
शिरुर 
गेल्या तीन वेळेस शिरुर शहर व पंचक्रोशीने शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगले मताधिक्य दिले असुन शिरुर शहरासाठी भरघोस निधी आढळराव यांनी उपलब्ध करुन दिला असुन पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता या वेळेस सुध्दा शिवाजीराव आढळराव पाटील मोठे मताधिक्य शिरुर शहर व पंचक्रोशीतुन मिळेल असा विश्वास कल्पनाताई आढळराव पाटील यांनी व्यक्त केला .
शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांनी शिरुर शहरातून पदयात्रा काढत शिरुरकरांशी संवाद साधला. पदयात्रेला शहरात चांगला प्ररिसाद मिळाला यावेळी त्यांनी या पदयात्रेची सुरुवात शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून प्रारंभ केला.
ही पदयात्रा जुन्या पुणे नगर रस्त्याने शिरुर बसस्थानक समोरील परिसर , कापडबाजार , आडत बाजार , राम आळी , सोनार आळी ,सुभाष चौक ,सरदार पेठ ,हलवाई चौक परिसरासह गावातील अन्य परिसरात गेली.
यावेळी कल्पना आढळराव पाटील यांनी शिरुर शहरात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना दिली.तसेच प्रत्येक नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला.या पदयात्रेत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे,भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे , माजी संचालक सुधीर फराटे ,भाजपाचे शहरप्रमुख नितीन पाचर्णे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे , शहराध्यक्ष शरद कालेवार , राजेंद्र कोरेकर , आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , मयूर थोरात,याच्यासह माजी नगसेविका अंजली थोरात , श्रुतिका झांबरे, ताज्ञिका कर्डीले,मनिषा कालेवार ,रेश्मा लोखंडे , सुदाम चव्हाण ,भरत जोशी , सुरेश गाडेकर , रेश्मा शेख , राजू शेख ,केशव लोखंडे , प्रवीण मुथ्था , अनघा पाठकजी , विजय नरके , प्रिया बिरादार ,भारती शहाणे , नीलेश नवले ,वैशाली ठुबे , राजश्री शिंदे, उमेश जाधव , सोनू काळूखे , दादाभाउ लोखंडे ,अतुल गव्हाणे , टिकूशेठ ओस्तवाल यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘अब की बार चारसो पार ‘व ‘महायुतीचा विजय असो ‘ अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!