शिरूर तालुक्यात गरोदर मातांना असा निकृष्ट आहार पुरविणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 

शिरूर तालुक्यात गरोदर मातांना असा निकृष्ट आहार पुरविणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केली आहे . 

     याबाबतचे निवेदन आज रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागात देण्यात आले.

यावेळी रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले,डॉ वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद, गिता आढाव, शकीला शेख, मोनिका मोहिते आदी महिला उपस्थित होत्या.

आंबळे येथे पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या व सोनकिडे निघाल्याने प्रसार माध्यमांनी याची दखल घेतली. त्यानंतर सर्वात प्रथम खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या सर्व प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सरकार लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रशासन वाऱ्यावर सोडले असल्याची टिका केली होती.

या सर्व प्रकारानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली आणि संबंधित खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या संपुर्ण प्रकारची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. 

पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या पोषण आहारात आंबळे (ता. शिरुर) येथे अळ्या व सोनकिडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दि 12 एप्रिल 2024 रोजी घडला होता.

      त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांनी आज प्रत्यक्ष आंबळे (ता. शिरुर) येथे अंगणवाडीत जाऊन सदर पोषण आहाराचा तक्रारदार महिलेच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर हा आहार ताब्यात घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असुन त्याचे रिपोर्ट आल्यानंतर संबधित ठेकेदार दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे चोभे यांनी सांगितले.
 पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या निकृष्ट पोषण आहाराबाबत सखोल चौकशी करुन दोषी असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारे देण्यात येणारा निकृष्ट दर्जात आहार गरोदर महिला व त्यांच्या पोटातील बाळाला धोकादायक आहे. शासन याबाबत गंभीर नाही महिला बाल विकास खातेकरते तरी काय?
राणी कर्डिले
रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!