शिरूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस 15 ते 20 जणांना घेतला चावा घेतल्याने भीतीचे वातावरण

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी

      शिरूर शहरातील होलार आळी,सय्यद बाबा नगर, साईनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    चावा घेनाऱ्यामधे दोन ते पंधरा वर्षे  वयाचे तसेच काही पुरुषांनाही कुत्र्याने चावा घेतल्या असल्याचे आढळले आहे.

या पिसाळलेल्या कुत्र्याने 15 ते 20 जणांना चावा घेतला असून येतील सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी सांगितले.
 यामुळे शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

साई अमोल वाईकर वय ६, जवेरिया नदीम काकर वय ६, रिदा हनिफ शेख वय २,मानसी रमेश इसवे वय १४, अलमस सादीक शेख मंगेश सोन्याबापू घनवट, ऐजान नसीम राजे या सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेण्यात येऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले आहे. 

       शिरूर शहरातील होलारआळी सय्यद बाबा नगर साईनगर परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोत घातला या भागात सायंकाळीची वेळ असल्याने  नळाला पाणी आलेने महीला नळावर तर या परिसरात असणारे लहान मुले रस्त्यांवर गल्लीत खेळत होती रस्त्यांवर जाणारे नागरीक यांच्यावर अचानक पाठीमागून कुत्र्यांनी हल्ला करून हातावर , पायावर,मांडीला, कानाला ,पाठीला, पृष्ठभागावर, जखमी केले. जखमी नंतर काही जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले तर सात जण शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल झाले.

येथे त्यांना रेबीज लस देऊन जर कुत्रा पिसाळलेल्या असतील तर त्यासाठी वेगळी लस सुविधा शिरूर ग्रामीण रुग्णालयात नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले आहे. 

       मागील काही दिवसापूर्वी शिरूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण केले होते. त्यामुळे काही काळापुरते या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला होता. परंतु एक दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा शहरात या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. 

आजच्या या मोकाट कुत्र्यांमध्ये एका कुत्र्याला नागरिकांनी  जायबंद केले तर एक कुत्रा शहरात मोकाट फिरत असल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

    तर शिरूर नगरपरिषदेच्या वतीने पुन्हा एकदा या मोकाट कुत्र्यांविषयी कार्यवाही करणे गरजेचे आहे. व शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांपासून वाचवावे असे आव्हान नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!