शिरूर शहारातील मध्यवर्ती मुख्य बाजारपेठ ठिकाणी जैन समाजाचे श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकाला मारहाण करून बांधून ठेवून मंदिरातील दरवाजाचे कटावणीने उचकटून मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून दानपेटीतील अंदाजे लाख रुपयांची रक्कम एक मोबाईल फोन अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेला आहे.
चोरटयांनी मंदिरातील चांदीच्या दागिन्यांना हात लावला परंतू दागिणे चोरले नाही. परंतू दान पेटीत असणारी रकमेतील नोटा मात्र चोरुन नेल्या चिल्लर पेटीत खाली पडल्याचे दिसून आले.
मंदिर ट्रस्ट यांनी चोरी गेलेली आठ महिन्याची रक्कम अंदाजे दोन लाखाच्या पुढे असल्याचे सांगितले तर पोलीस फिर्यादीत ही रक्कम 37 हजार एवढी लेली आहे.
भर वस्तीत असणारे या मंदिरात चोरी झाल्याने शिरूर शहरात घाबराठीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मंदिराची सुरक्षारक्षक पोपट सोनवा घनवट (राहणार वाडेगव्हाण तालुका पारनेर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
हि चोरी आज दिनांक २० एप्रिल मध्यरात्री १वाजून ३०ते रात्री दोन दरम्यान घडली.
शिरूर पोलिसांच्या रात्री गस्तीपथकाने चोरी होण्याच्या काही मिनिट अगोदरच रात्रीची गस्त घालण्यात असलेल्या पोलीस पथकाने या मंदिराचा सुरक्षित असल्याचा फोटोही काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिरूर शहरात प्रमुख बाजारपेठेत जैन समाजाचे श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर असून जैन समाजाचे श्रद्धास्थान आहे.
चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
घटनास्थळाव ला आमदार अशोक पवार शिरूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी भेट दिली. तर घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतिराव गुंजवटे पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव, एकनाथ पाटील व पोलीस कर्मचारी यांनी घटनेची गंभीरता घेऊन तात्काळ त्या ठिकाणी येऊन पंचनामा करून श्वान पथक पाचारण केले.
श्वान पथकाने हलवाई चौक, भाजी बाजार, हल्दीमोहल्ला पर्यंत माग काढला.
तीनही चोरटे 25 ते 30 वयोगटातील होते त्यांनी तोंडाला बांधलेले होते.
शिरूर शहरात मध्यवर्ती बाजार पेठेत असणारे जैन समाजाचे मंदिर रात्री दहा नंतर बंद झाल्यानंतर या ठिकाणी असणारे व मंदिराचे पुजारी यांनी मंदिर बंद करून कुलूप लावल्यानंतर पुजारी आपल्या घरी निघून गेले तर वाचमेन सुरक्षितेसाठी तेथे थांबला. रात्री दीड त्यांना दरम्यान वॉचमन मोबाईल रिचार्ज लावण्यासाठी आत मध्ये गेले असता त्याच वेळेत मंदिराच्या बाजूवरील बोळीतून कंपाउंड वर चढून तीन तोंड बांधलेले चोरटे यांनी मंदिरात प्रवेश केला. सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी जात होता तेथे जाऊन त्याला पकडून त्याच्या डोक्यात हातामध्ये असणारा स्क्रू ड्रायव्हर जोराने मारून स्क्रू ड्रायव्हर पोटाला लावून खुनवून ओरडू नको असा दम दिला. व त्याच्याजवलील कापडाने सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधले व एक जण त्याच्याजवळ थांबून दोघेजण मंदिरातील प्रमुख दरवाजा कडी कोयंडा तोडला व लॉक कटवनाने उत्कटून मंदिरात प्रवेश केला. आत मध्ये जाऊन त्यांनी मंदिरातील दानपेटी चा दरवाजा कटावणीने उचकटून त्यातील रोख नोटा अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये त्याच्या जवळील बॅगेत भरून वं चिल्लर तेथेच ठेऊन मुख्य मंदिरातील देवाचा चांदीचा टोप आभूषणे काढून बाजूला ठेवले व इतर वस्तूला हात लावला नाही. आणि चोरटे यांनी सुरक्षारक्षकला चोरट्यांकडे कापडाने हात पाय बांधून त्याच्याकडील मोबाईल फोन घेऊन पलायन केले त्यानंतर सुरक्षारक्षकाने आरडाओरडा करून बाजूस राहणाऱ्या पुजारी जागा झाला तर त्यांनी सुरक्षारक्षकाची सुटका केल्यानंतर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सतीश धाडीवाल, सदस्य रमेश कर्णावट , सुभाषभाई शाह यांना मोबाईल वरून चोरी झाल्याची कळवल्यानंतर लगेचच ट्रस्टी मंदिरात आली व त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला याबाबतची खबर दिली. खबर देतात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिस्थितीचा पाणी केल्यानंतर चोरट्यांचा माघ काढण्यासाठी तात्काळ पुण्यावरून श्वानपथक बोलवून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करीत आहे.