शिरूर राम नवमी निमित्त शहरात बजरंग दल व बजरंग सेना यांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक आकर्षण ठरल्या

9 Star News
0

शिरुर दिनांक ( प्रतिनिधी) 'सियावर प्रभू रामचंद्र कि जय 'व जय श्रीरामच्या जयघोषात शिरुर शहर आणि परिसरात श्रीराम जयंती उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली . प्रभू श्री रामाचा भव्य पुतळा व श्री हनुमान गोहत्या बंदी महादेव शिरूरच्या रामनवमी मिरवणुकीचे आकर्षण ठरले.


शिरूर बजरंग दल व बजरंग सेना यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आल्या होत्या.
     शहरातील राम आळीतील समस्त नामदेवमहाराज शिंपी समाजाच्या श्रीराम मंदिरात, शिवासेबा मंडळ देवस्थान येथे राम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .          
 रामनवमीनिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती . यावेळी श्रीराम जन्माचे प्रवचन ह .भ. प . गाडे महाराज यांचे प्रवचन झाले . त्यांनी प्रभू श्रीराम यांच्यातील विविध गुणांची माहिती दिली . जन्मोत्सवाचा वेळी श्रीरामजन्माचा पाळणा म्हणण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होते . यावेळी श्रीराम नामाचा गजर करण्यात आला .जन्मोत्सवानंतर सुंठवडा व खरबूजाच्या प्रसाद वाटण्यात आला . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर .सिध्देध्वर बगाडे ,विवेक बगाडे , महेश बोत्रे ,गायक हरि मेहंदरकर , मनोज पांढरकामे , साकेत गुजर , ॲड .नाना पाटेकर , कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर , भाजपाचे माजी शहराध्यक्ष ललित नहार, शहर उपाध्यक्ष प्रवीण मुथ्था , ह .भ .प .कानिफनाथ वाखारे , रामभाउ लोखंडे , गायक वैभव मराठे , प्रकाश बाफना , प्राचार्य डॉ .समीर ओंकार , किसनराव लोखंडे , डॉ . नूतन क्षीरसागर , स्वामी समर्थ मंडळ शिरुरचे प्रमोद पवार , आदी उपस्थित होते .
बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य मोरेश्वर तारू,  उत्सव प्रमुख अमोल लुनिया,आशिष उबाळे, प्रतिक शर्मा, गौरव लोढा, सुनिल ईन्दुलक सागर परभने, रोहन जामदार, गणेश राक्षे, अविष्कार लांडे, रविन्द्र‌ बैनाडे 'चेतन तुबाकी, साहिल घावटे, कबीकेश घोगरे, ऋषिण गुजर, , बजरंग सेना उमेश शेळके, उत्सव प्रमुख राकेश परदेशी,
जन्मोत्सवा नंतर भाविकांसाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद शिरुर यांचा वतीने महप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . रामलिंग मंदिर शिरुर , शिवसेवा मंदिर , याठिकाणीही श्रीराम नवमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . फोटो ओळी शिरुर येथील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी करण्यात आली .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!