शिरूर प्रतिनिधी
श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी कुटुंबातील सागर वाघमारे यांनी तहसीलदार पदी तर पत्नी प्रीती घोरपडे-वाघमारे यांची गटविकास अधिकारी निवड झाली आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वाघमारे पती-पत्नी यांनी यश मिळवत एकच वेळी प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत.वडील नामदेव वाघमारे हे शिक्षक तर आई गृहिणी असल्याने अभ्यासाचे बाळकडू घरातूनच मिळाले.सागर यांचे शिक्षण जि.प.प्रार्थमिक शाळा काष्टी येथून झाले तर बेलवंडी येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.विद्याधाम प्रशाला शिरूर येथून अकरावी बारावी शिक्षण पूर्ण करत.पुणे येथील अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.आय टी मध्ये जॉब स्वीकारला.परंतु अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले वाघमारे यांनी चांगले पॅकेज सोडून त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.२०१८ पासून स्पर्धा परीक्षेस सुरुवात केली.२०१९ साली फूड इन्स्पेक्टर म्हणून पास झाले.पण महसूल खात्यात अधिकारी होण्याचे स्वप्न वाघमारे यांचे होते.कोरोनाकाळात अभ्यासाला चांगला वेळ मिळाला.२०२२ चे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात ५५ वा येत डी.वाय.एस पी.पदाला गवसणी घातली.परंतु महसूल मध्येच यायचे यामुळे तहसीलदार पोस्ट घेतली.अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद कुटुंबाला झाला.पण दुग्धशर्करा योग म्हणजे २०२१ साली कुरुळी ता.शिरूर येथील प्रीती घोरपडे हिच्याशी सागर यांचा विवाह झाला.प्रीती घोरपडे यांचे आई मंगल व वडील शांताराम शिक्षक असल्याने नियुक्तीच्या ठिकाणी सादलगाव,वडगाव रासाई मध्येच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले.लहान पणा पासून प्रशासकीय सेवेत जाण्याची धडपड लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यश मिळविलेले अनेक अधिकारी त्यांना मिळणारा मानसन्मान याचे आकर्षण होते.२०२२ चे परीक्षेत गटविकास अधिकारी पदी निवड झाल्याने आनंद झाला.सर्व श्रेय मी आई आणि वडील तसेच पती सागर यांना देत आहे.लग्नानंतर अभ्यासात खंड पडेल की काय भीती होती पण पती सागर यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.
चौकट-अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आय टी मध्ये जॉब स्वीकारला.अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले याची खंत मनात होती.बरोबरचे अनेक मित्र स्पर्धा परीक्षा पास झाले.आणि मित्रपरिवार यांचे मुळे पुन्हा स्पर्धा परीक्षेची ऊर्जा मिळाली.स्वप्न तहसीलदार होण्याचे होते ते मिळाल्याने समाधानी आहे.
चौकट-आई-वडील शिक्षक असल्याने कोणते क्षेत्र निवडायचे प्रश्न होता.पण सरकारी यंत्रणा,ग्रामविकास आणि मातीशी नेहमी जोडलेली राहावी म्हणून स्पर्धा परीक्षा निवडली.२०१६ पासून जॉब करता करता अभ्यास केला.अभ्यासाती सातत्य हेच माझे यश.स्वप्न उपजिल्हाधिकारी होण्याचे आहे.
प्रीती घोरपडे-वाघमारे गटविकास अधिकारी