शिरूर शहरासह तालुक्यात गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट... प्रकरण रफादफा करण्यासाठी कोट्यावधीची मलतयारी होती चर्चेला उदान..
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील अनेक खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर येथे अवैद्यरित्या गर्भलिंग निदान केले जात असून यासाठी हजारो रुपयांची मागणी येथील वैद्यकीय अधिकारी घेत आहे हे माहिती असूनही शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना यावर कारवाई करण्याऐवजी या रुग्णालयांना पाठीशी घालत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. तर काल ढोकसांगवी येथील डॉक्टरला या प्रकरणातून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू कोट्यावधीची माया देवाण घेवाण फसली असल्याची चर्चा या परिसरात आहे. मध्यस्ती करिता प्रयत्न करणाऱ्या कोट्यवधीची माया मागतली त्याचा शोध घेणार का पोलीस... कारवाई करणाऱ्या पथकाने योग्य कारवाई केली असल्याने देवानघेवाणीला भीक न घातल्याने तालुक्यातून त्यांची कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील एका डॉक्टरला नुकतेच गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडले आहे.
शिरूर शहरात व शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनोग्राफी सेंटर व स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन आहे. यातील अनेक डॉक्टर अशा प्रकारे सोनोग्राफी सेंटर मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे देऊन गर्भलिंग निदान करून घेत आहे. याबाबत शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती आहे परंतु हे डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांच्यातील सुरू असलेल्या देवाण-घेवांमुळे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक गर्भलिंग निदान केंद्रामध्ये देव व देवीचे चित्र ठेवले आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन मुलगा का मुलगी हे सांगण्याऐवजी देवांच्या फोटोवर हात ठेवले जात असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे मुलगी जन्मा येणे अगोदरच तिला खोडल्या जाते व त्यासाठी देवावर किंवा देवतांवरच हात ठेवले जातात ही अतिशय भयावयव गोष्ट आहे.
एखाद्या माणसाने किंवा एखाद्या रुग्णाने याबाबत तक्रार केल्यास तालुका वैद्यकीय अधिकारी यांची एक मोठी संघटना आहे ही संघटना लगेच याबाबत आंदोलनाचा इशारा देऊन अशा डॉक्टरांना पाठीशी घालत असले जे ही चित्र काही वेळा समोर आले आहे . तर ही संघटना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबावही आणत असल्याचे दिसून येत आहे. कारण सोनोग्राफी सेंटर व शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्यातील पाकीट संस्कृती याला कारणीभूत आहे.
हा सर्व खेळ महाराष्ट्र मंत्रालयापासून ते गाव खेड्यांमध्ये सुरू आहे. कुठलीही गर्भलिंग निदान करायचे असेल तर खुलेआम पैसे द्या आणि गर्भलिंग निदान करून घ्या आमचे कोणी वाकडे करत नाही असेच या डॉक्टरांची मग्रुवी आहे.
यावर आजपर्यंत कोणी आवाज उठवत नाही परंतु काल शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे मोबाईलवर गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणाच्या व किती जणांची अशाप्रकारे गर्भलिंग निदान केले आहे हे याची खोलवर चौकशी केल्याशिवाय कळणार नाही. यामध्ये शिरूर शहरातील व तालुक्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .परंतु चौकशी करणारे ही मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात आहे. त्यामुळे घटना घडून रंगेहात पकडूनही पालथ्या घड्यावर पाणीच असणार आहे हे मात्र नक्की खरे!
ज्या पुणे येथील पथकाने या सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली ही कारवाई होऊ नये म्हणून काही मध्यस्ती कोट्यावधीची देवानघेवाण करण्याच्या तयारीत होते. परंतु पथकाने याला भीक न घातल्याने ही कार्यवाई झाली यामुळे या पथकाचे शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे.

