शिरूर, प्रतिनिधी
हर हर महादेवच्या जयघोषात आणि शिवनामाच्या अखंड गजरात सात दिवस सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी कथन केलेल्या श्री शिवमहापुराण कथेची भावपूर्ण वातावरणात ऐतिहासिक लाखाहून जास्त भक्तांच्या गर्दीत सांगता झाली तर अनेक भाविकांचा कंठ दाटून आला होता.
शिरूर घोडनदी येथे पी आर धारीवाल फाउंडेशनच्या वतीने सात दिवसांपासून सुरू असलेल्या कथेचा आज शेवट झाला यावेळी पी आर धारिवाल फाउंडेशनचे तथा उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्याच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, चिरंजीव युवा उद्योजक आदित्य धारिवाल, कन्या साक्षी मेहता यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन श्री शिव महापुराण कथावाचक पंडित आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांचा सन्मान करण्यात आला.
शिरूर शहरांमध्ये गेली सात दिवसांपासून श्री शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी राज्यातून देशातून मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केली होती ही गर्दी शिरूर शहरातील ऐतिहासिक गर्दी म्हणून नोंद होणार आहे
सध्या अन्नाची कमी नाही परंतु माणसाला भूक लागत नाही कारण माणूस आता चिंतेमध्ये राहत असतो, माणसाकडे सर्व काही आहे परंतु त्याला झोप लागत नाही कारण तो चिंतेमध्ये असतो त्यासाठी माणसाने श्री शिव महापुराण कथासारखी ऐकली तर तो चिंतामुक्त होणार असल्याचे आचार्य प्रदीप मिश्रा यांनी सांगून चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा, सध्या मोठ्या प्रमाणात गोड खाल्ल्या जाते परंतु एकमेकांविषयी गोड का बोलत नाही गोड जर तुम्ही खात असाल तर गोड बोलायलाच पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यासाठी आध्यात्मिक गोष्टींकडे वळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रद्धेने आणि विश्वासाने शिवपुराणाचे श्रवण केल्यास निश्चितच चांगले फळ मिळते. शिव आहे म्हणून सत्य आहे,” असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनावर भाष्य केले तर चुकीची कर्मे करू नका जसे वागाल तसे फळ मिळेते असा कर्मयोगाचा संदेश देत त्यांनी शिवसाधनेतून जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते असतो असा सल्लाही भाविकांना दिला.
श्री शिवमहापुराण कथा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवणारा उपक्रम आहे,” असे भावनिक प्रतिपादन मुख्य संयोजक उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी केले. “हा कार्यक्रम सर्वांचा होता; शिरूरकरांच्या सहकार्यामुळेच तो यशस्वी झाला,” असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वर्गीय रसिकलाल धारिवाल हे शिवभक्त होते, त्यांच्या प्रेरणेनेच हा सोहळा साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोप सोहळ्यास उद्योगपती आदित्य धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, साक्षी धारिवाल,उज्ज्वला लुंकड, सुरेखा चोपडा, कल्पना लुनावत,आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार , माजी नगरसेवक विजय दुगड आदी मान्यवर उपस्थित होते. ‘हर हर महादेव’च्या गजरात आणि भजनांच्या तालावर भाविकांनी भक्तिरसात सात दिवस रमून गेले.
सात दिवस उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल कुटुंबियांकडून श्री शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांना उत्तम प्रकारचे भोजन राहण्याची व्यवस्था केल्याने भारावून गेलेल्या भाविकांनी धारीवाल कुटुंबांना तोंड भरून आशीर्वाद दिले व जाताना अशा प्रकारची भाविकांची सेवा कुठेच झाली नाही ही सेवा नक्कीच फळाला येईल असा आशीर्वादही उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांना भाविकांनी दिला.

