शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाईत आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
शिरूर ( प्रतिनिधी ) कान्हूर मेसाई ता. शिरूर येथे घरासमोर खेळत असलेल्या आठ वर्षीय बालिकेवर अल्पवयीन युवकाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कान्हूर मेसाई ता. शिरूर येथील आठ वर्षे बालिका घरासमोर खेळत असताना गावातील अल्पवयीन युवकाने बालिकेच्या घरात येत बालिका घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, मात्र सायंकाळी बालिकेला अचानक ताप आल्याने व युवतीची प्रकृती संशयित वाटू लागल्याने पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बालिकेची तपासणी करत बालिकेवर अत्याचार झाल्याचे पालकांना सांगितले यावेळी पालकांना धक्का बसल्याने पालकांनी बालीकेला विश्वासात घेत विचारपूस केली असता बालिकेंनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला, याबाबत बालिकेच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सदर अल्पवयीन युवकावर बाल लैंगिक अत्याचार सह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.

