शिरूर नगरपरिषद निवडणूक करिता 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार - अभिजीत जगताप

9 Star News
0

 शिरूर नगरपरिषद निवडणूक करिता 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार - अभिजीत जगताप


शिरूर प्रतिनिधी 

        शिरूर नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर सकाळी दहा वाजता सुरू होणार असून ही मतमोजणी शिरूर नगरपालिका नवीन इमारत येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रितम पाटील यांनी दिली आहे.

         शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे ही मतमोजणी 21 डिसेंबर सकाळी दहा वाजता सुरू होणार असून 12 टेबल वर 12 प्रभागाची मतमोजणी होणार असून यासाठी प्रत्येक उमेदवारांची आपला एक मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीसाठी असणार तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी 12 टेबलवर प्रत्येकी एक असे 12 मतमोजणी प्रतिनिधी असणार आहेत. 

या मतमोजणीसाठी 100 कर्मचारी त्यामध्ये अधिकारी कर्मचारी अशी नेमणूक केली आहे. 

या मतमोजणीसाठी उमेदवारांसाठी वेगळा कक्ष पत्रकारांसाठी वेगळा कक्ष करण्यात आला आहे.

      या मतमोजणीसाठी एकूण चार फेऱ्या होणार असून यामध्ये काही प्रभागाच्या दोन फेऱ्यातच निकाल लागणार आहे तर काही प्रभागांचा तीन फेऱ्यात निकाल लागणार आहे तर काही प्रभागांचा चार फेऱ्यांमध्ये निकाल लागणार असून फेरी निहाय निकाल सांगण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी सांगितले.

       फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल सांगण्यात येणारा असून मतमोजणी केंद्राबाहेर १०० मीटरआत कोणालही येता येणार नसून यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!