अखेर प्रतीक्षा संपली ! नगर परिषद निवडणूक लागल्या २ डिसेंबर २५ रोजी होणार मतदान तर निकाल ३ डिसेंबर २५ रोजी लागणार .... आज पासून लागली आचारसंहिता...
शिरूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपरिषद ४२ नगर पंचायत निवडणुक मतदान दिनांक २ डिसेंबर २५ रोजी होणार असून निकाल ३ डिसेंबर निकाल लागणार, यासाठी आज दिनांक ४ नोव्हेंबर २५ पासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले असल्याने निवडणुकीचा धुराळा उडाला आहे
ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी जाहीर होणार आहे. ईव्हीएम द्वारे निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
खर्चाची मर्यादा क वर्ग नगराध्यक्ष उमेदवार साठी सात लाख तर सदस्यासाठी रुपये खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे..
आज सकाळपासूनच निवडणूक आयुक्त यांच्या पत्राने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. नक्की निवडणुका लागणार का? का निवडणुकीबाबत आणखी काय आहे याबाबत अनेकांची द्विधा मनस्थिती होती. तर अनेकांनी निवडणुका जाहीर होतील याच्या चर्चा रंगल्या होत्या . अखेर या चर्चांचा उलगडा झाला आणि राज्यात नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी चार ते पाच वर्षांपासून महापालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली होती. तर अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते.
परंतु निवडणुका पुढे मागे जात होत्या न्यायालयीन कारण आरक्षणाचे कारण यामुळे निवडणुका होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूरही होता.
आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १० नोव्हेंबर २५ ते १७ नोव्हेंबर २५ कालावधी. उमेदवारी अर्ज छाननी १८ नोव्हेंबर २५ रोजी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे २१ नोव्हेंबर पर्यंत तर चिन्ह वाटप २७ नोव्हेंबर तर निवडणूक मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून, निवडणूक निकाल निकाल ३ डिसेंबर २५ जाहीर होणार आहे.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक कोकण – 17 नाशिक -49 ,पुणे -60 , संभाजीनगर -52 , अमरावती -45 , नागपूर -55
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
नामनिर्देशन अर्जभरणे- 10 नोव्हेंबर 25 ते
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर
अर्जाची छाननी - 18 नोव्हेंबर 25
अर्ज मागे घेण्याची तारीख- 21 नोव्हेंबर 25
उमेदवारांची अंतिम यादी- 26 नोव्हेंबर 25
मतदान दिनांक - 2 डिसेंबर 25
मतमोजणी - 3 डिसेंबर 25

