शिरूरच्या दांडी बहाद्दर मुख्याधिकारी प्रितम पाटील व कर्मचारी यांना जिल्हा सहआयुक्तांचा दणका.. तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश

9 Star News
0

 शिरूरच्या दांडी बहाद्दर मुख्याधिकारी प्रितम पाटील व कर्मचारी यांना जिल्हा सहआयुक्तांचा दणका.. तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश


शिरुर, प्रतिनिधी 

         शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील व विविध कार्यालयीन प्रमुख सातत्याने अनुपस्थित राहत असल्याच्या गंभीर तक्रारीवर जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी थेट दणका दिला आहे. भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केलेल्या लेखी तक्रारी वरून तीन दिवसात स्पष्टीकरण मागवले आहे. तसे पत्रही त्यांना देण्यात आले आहे.

            जिल्हा नगरपालिका प्रशासन सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी हे आदेश काढले आहेत.

          शिरूर नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून प्रशासक कार्यरत असून, मुख्याधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी एकहाती कामकाज सांभाळत आहेत. मात्र, यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याने हे मुख्याधिकारी सह सर्वच अधिकारी कार्यालयीन वेळेत सतत अनुपस्थित राहत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले असून याबाबत भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी जिल्हा आयुक्त नगरपालिका शाखा व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे 

         विशेष म्हणजे शिरूर नगरपरिषदेचे हजेरी व हालचाल रजिस्टर गेल्या अनेक महिन्यांपासून भरले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. "वरिष्ठ कार्यालयीन कामानिमित्त बाहेर" हेच एकमेव कारण देऊन अधिकारी प्रत्यक्षात नगरपरिषदेत न हजर राहता उघड दांडी मारत असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत.


        दरम्यान, कामानिमित्त वारंवार नगरपालिकेच्या उंबरठ्यावर येऊन देखील काम न होणाऱ्या सर्वसामान्य शिरूरकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने सुरू असलेल्या या कामकाजामुळे नागरीकांचे हाल होत असून, जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा, पुणे येथे तक्रार दाखल करून हजेरी व हालचाल रजिस्टरची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    अन्यथा, ही ढिसाळ प्रशासन पद्धती तातडीने थांबवली नाही तर नगरपरिषदेच्या दारात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांच्यावतीने मागणी करण्यात आली होती. 

       याची गंभीर दखल आयुक्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी घेतल्याने व सतत गैरहजर व हालचाल रजिस्टर रिकामे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले असून,

याबाबत तीन दिवसात खुलासा करावा असे पत्र 12 ऑगस्ट रोजी शिरूर नगर परिषदेत दिले आहे . या कारवाईबद्दल

सुशांत कुटे यांनी सहआयुक्तांचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!