शिक्रापुरातून इसमाचे अपहरण करुन डांबून मारहाण
पैशासाठी अपहरण मारहाण करत टोळक्याचे धरारनाट्य
शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण चौकातून प्रवास करणाऱ्या एका इसमाचे मधून उतरवून अपहरण करुन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात पैशाच्या मागणीसाठी डांबून हातपाय बांधून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अमोल कुंडलिक हरगुडे, रोहन मदन मारडीकर, संजय बबन वीरकर यांसह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे काही दिवसांपूर्वी अमोल हरगुडे यांच्या खोलीत भाड्याने राहणाऱ्या गोकुळ खांडरे याने त्याच्या ओळखीच्या यादव नावाच्या इसमाला अमोल हरगुडे व रोहन मारडीकर यांच्याकडून काही पंधरा लाख रुपये घेऊन दिले होते, त्यांनतर आठ लाख रुपये परत दिले मात्र काही दिवसांनी यादव काही कारणामुळे जेलमध्ये गेला असल्याने यादव कडून पैसे येणे बंद झाल्याने यादव जेलमधून आल्यानंतर मी पैसे देतो असे गोकुळ याने अमोल व रोहन यांना सांगितले मात्र तरी दोघे त्याच्याकडे पैशाबाबत तगादा लावत होते, तर २९ जुलै रोजी गोकुळ हा एका बस मधून प्रवास करत असताना अमोल व रोहन यांनी त्याला बसमधून उतरवून त्याला मारहाण करत पैसे दे असे म्हणून कार मधून अपहरण करत सणसवाडी येथे नेऊन मारहाण केली त्यानंतर आळंदी येथे घेऊन जात एका खोलीमध्ये हातपाय बांधून ठेवत बेदम मारहाण केली, दरम्यान गोकुळ याने त्याच्या काही मित्रांना घडलेला प्रकार सांगत मोबाईल हून लोकेशन पाठवले असता गोकुळचे मित्र आळंदी येथे गेले त्यांनी आळंदी पोलिसांना माहिती देत गोकुळची सुटका करत त्याला शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आणले, याबाबत गोकुळ पंडितराव खांडरे वय ३५ वर्षे रा. कसबा बावडा, राजाराम कॉलनी ता. कोल्हापूर जि. कोल्हापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अमोल कुंडलिक हरगुडे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, रोहन मदन मारडीकर रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, संजय बबन वीरकर रा. केळगाव ता. खेड जि. पुणे यांसह दोन अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आ
हे.