मांडवगण फराटात शालेय अल्पवयीन मुलीवर अत्याचार अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल ....
शिरूर ( प्रतिनिधी )
मांडवगण फराटा ता. शिरुर परिसरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अत्याचारात शालेय युवती गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली असून शिरुर पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवगण फराटा ता. शिरुर येथे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शालेय युवतीच्या पोटात वारंवार दुखू लागल्याने युवतीच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांना शंका आल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता युवती गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली, दरम्यान डॉक्टरांनी याबाबतची माहिती शिरुर पोलिसांना दिल्याने महिला पोलिस व युवतीच्या कुटुंबीयांनी युवतीकडे विचारपूस केली असता युवतीने घडलेला प्रकार सांगितला असता एका अल्पवयीन युवकाने युवतीला लग्नाचे आमिष देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले,
याबाबत पिडीत युवतीच्या जबाबानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन युवकावर बाललैंगिक अत्याचार बाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.