जागतिक पर्यावरण दिनी डेक्कन स्कूल मध्ये वृक्षारोपण
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील डेक्कन स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते नारळ, केळी, सुपारी, रक्तचंदन, बेल, चाफा , लिंब आदी वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी शिरूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, शिक्षक प्रतिनिधी श लवू धारजे यांनी कळमकर यांना शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाची सुरूवात देखील करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतील ७० मुलांना एक झाड देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या झाडाचे संगोपन करायचे आहे.
यावेळी अमोल वाघमारे, सखाराम पुरी, चंद्रकांत झांजे, रत्नमाला महाजन, प्रिया नरवडे, सोनाली लोखंडे, संतोष गावडे, धनंजय जमदाडे, हृतिक लुनिया उपस्थित होते.