शिरूरमध्ये वाढदिवसाच्या दिवशीच चंदाबाई या होमगार्ड महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले.. सोनसाखळी चोरांचे पोलिसांनाच आव्हान

9 Star News
0

 शिरूरमध्ये वाढदिवसाच्या दिवशीच चंदाबाई या होमगार्ड महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले.. सोनसाखळी चोरांचे पोलिसांनाच आव्हान 


शिरूर, प्रतिनिधी 

       शिरूर शहरातील प्रितमप्रकाश नगर परिसरात ५५ वर्षीय होमगार्ड चंदाबाई या महिलेला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गर्दीच्या ठिकाणी गळ्यातील सोन्याचे गंठण सत्तर हजार रुपयांचे सोनसाखळी दुचाकी वरून आलेल्या दोघा चोरांनी ओढून नेले असल्याने महिला वर्गात भीती आणि खळबळ उडाली आहे. शिरूर शहरात होमगार्ड म्हणून रोड रोमिओ तर शिरूर बस स्थानकामध्ये चोरांमध्ये दहशत असणारे चंदाबाई यांच्यात गळ्यातील सोन्याचे गंठण चोरांनी ओढून नेल्याने सोनसाखळी चोरांनी पोलिसांना आव्हान दिले असे म्हणावे लागेल.

       याबाबत चंदाबाई बबन चव्हाण (वय 55, रा. प्रितमप्रकाश नगर, नक्षत्र बिल्डिंग शेजारी, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादी चंदाबाई बबन चव्हाण यांचा 1 जून 2025 रोजी वाढदिवस असल्याने त्या राहत असलेल्या ठिकाणी महिलांसाठी जेवणाचे आयोजन केले होते चंदाबाई यांचे जेवण झाल्यानंतर रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घराच्या पार्किंगमध्ये हात धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी पार्किंग गेटजवळ दोन अनोळखी इसम उभे होते.यापैकी एका चोरट्याने चंदाबाईंच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण (ज्यात दोन भरीव चौकोनी आणि काळ्या रंगाचे डिस्को मणी होते) किंमत सत्तर हजार रुपये किंमतीचे जबरदस्तीने हिसकावले. अचानक झालेल्या या हल्ल्याने चंदाबाईंनी आरडाओरडा केला असता, दोन्ही चोरटे एका मोपेड स्कुटी मोटारसायकलवरून वेगाने न्हावरा फाटा हायवे रोडच्या दिशेने पळून गेले.

      याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहे.

         शिरूर येथील होमगार्ड चंदाबाई चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त शिरूर शहरात फ्लेक्स लावले होते या फ्लेक्स बोर्डवर त्यांच्या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घातलेले होते. चोरांनी या फोटोवरून चंदाबाई यांचा माग काढून रात्री त्यांच्या प्रीतम प्रकाश नगर येथील घरी पाळत ठेवून गर्दीमध्येही असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले आहे. वाढदिवसासाठी लावलेल्या फ्लेक्स मधील फोटो मुळेच चंदाबाई यांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे आता महिलांनी दागिने वापरताना काळजी घेणे गरजेचे आ

हे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!