शिरूर मधील मागण्यासाठी मनसेच्या जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर शहरातील नागरी समस्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
शिरूरकर नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने उपोषणाचा हा टोकाचा मार्ग स्वीकारल्याचे सय्यद यांनी सांगितले.
या उपोषणाला शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे आणि सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पठारे यांची उपस्थिती लाभली.
मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:नगरपरिषद मालकीच्या भंगार साहित्याच्या विल्हेवाटीमध्ये अपहार झाल्याच्या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावेत.घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने न करता बिले उकळण्याच्या प्रकाराची चौकशी करावी.सांडपाणी व मलनिस्सारण प्रकल्प तात्काळ सुरु करून घोडनदी पात्रातील पर्यावरणाची हानी थांबवावी.बसस्थानकाजवळील नाल्यावर उभारलेली अनधिकृत भिंत काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे होणारे नुकसान थांबवावे.पुररेषेतील अतिक्रमण व नैसर्गिक नाल्यावरील अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवावीत.टोरँटो गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत.शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर आणि निर्बिजीकरण मोहिमेतील भ्रष्टाचारावर कारवाई करावी.शिरूर नगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या विज चोरीच्या प्रकरणाची चौकशी करावी.सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा.सफाई कर्मचाऱ्याच्या व्हायरल क्लिपप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सय्यद यांनी दिला आहे.