झिंजाय’ चित्रपटाचे स्पृहणीय यश – दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान

9 Star News
0

 झिंजाय’ चित्रपटाचे स्पृहणीय यश – दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान


शिरूर, प्रतिनिधी:

      दीप सिम्फनीज निर्मित, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक व अभिनेते दीपक घारू यांच्या दिग्दर्शनातील पहिल्याच चित्रपटाला ‘झिंजाय’ ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला आहे. नुकतेच नवी दिल्लीत झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी स्क्रीनिंग दरम्यान या चित्रपटाला ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन गौरविण्यात आले.

शिरूरचे अभिनेते दीपक घारू यांच्या कष्टाचे अभिनयाचे यश ...

वामन पतके लिखित या चित्रपटाने नवाडा (बिहार), तमिळनाडू, कोलकत्ता, बाली (इंडोनेशिया), अथेन्स (ग्रीस) येथे झालेल्या अनेक नामवंत फिल्म फेस्टिवलमध्ये ‘बेस्ट फीचर फिल्म’ आणि ‘बेस्ट डेब्यू डायरेक्शन’ चे पुरस्कार पटकावले. जयपूर, हरियाणा आणि कोलकत्त्यातील विविध फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची ऑफिशियल निवड झाली आहे.


       दिग्दर्शनासह कथा, संकलन आणि सहदिग्दर्शनाची जबाबदारी अर्क यज्ञ (दीप सिम्फनीज) यांनी उत्तमरित्या पार पाडली. प्रकाश धोत्रे, सुप्रिया गट, कैलासवासी सुनील जगधने यांच्यासह दीपक घारू यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


चित्रपटात दिलावर सिकलकर (सिनेमॅटोग्राफी), नितीन लचके (DOP), सिद्धेश कुलकर्णी (संगीतनिर्मिती), जयंत लोकखंडे (गीत), आणि अवंतिका मंडलिक, पियुष लोंढे (गायक) यांचे योगदान लक्षणीय ठरले.


या यशस्वी प्रकल्पात कार्यकारी निर्माते दादा ननवरे, प्रोडक्शन मॅनेजर आदर्श गोसावी, राधाकृष्ण कराळे, आणि लाइन प्रोड्यूसर अशोक शिंदे, सुधीर देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


‘झिंजाय’ ने पदार्पणातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दणदणीत यश मिळवत मराठी चित्रपटसृष्टीला अभिमानास्पद ठरले आहे.

तर संगीत अर्क यज्ञ आणि संगीत निर्मिती सिद्धेश कुलकर्णी यांनी केली आहे आणि गीते जयंत लोकखंडे यांनी लिहिली आहेत, 

      या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तसेच सुप्रिया गट, कैलासवासी सुनील जगधने, रुपेश पसपूल, राधाकृष्ण कराळे, डॉ. सुरेश शिंदे, सुधीर कुलकर्णी, विलास गोसावी, विजयकुमार नेटके, प्रतिमा कुतवळ, विद्या जोशी, श्वेता गमे, सीमा धारू, शौर्य वाळसे, बालकलाकार युगांत कुतवळ, वीर धारू, आर्यन साखरे, अर्णव साखरे तसेच स्वतः दीपक घारू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, चित्रपटाच्या यशात अखिल भारतीय चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज भोसले निलेशजी भदाणे, ॲड. ओमप्रकाश सतीजा, विलास गोसावी, डॉ. संतोष पोटे, प्रवीण गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



.

     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!