पोलीस पाटील नसरीन तांबोळी यांचे निधन
शिरूर
( प्रतिनिधी )
करडे ता. शिरुर गावच्या पोलीस पाटील तसेच कारेगाव येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम शाळेच्या आदर्श शिक्षिका नसरीन आरिफ तांबोळी वय ३८ वर्षे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, त्यांच्या मागे पती, दोन मुले, सासु सासरे, दीर असा परिवार आहे. तळेगाव ढमढेरे गटाच्या केंद्रप्रमुख शरीफा तांबोळी यांच्या त्या पुतणी होत.