शिरूर तालुक्यातील तब्बल ३७ शाळा शंभर नंबरी तर तालुक्यातील दहावीचा निकाल ९७.२९ टक्के

9 Star News
0

 शिरूर तालुक्यातील तब्बल ३७ शाळा शंभर नंबरी तर तालुक्यातील दहावीचा निकाल ९७.२९ टक्के  


शिरूर प्रतिनिधी 
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा शिरूर तालुक्याचा निकाल ९७.२९ टक्के एवढा लागला असून, असून यामध्ये ३७ शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे.
           शिरूर तालुक्यातून  ८२ शाळांमधील ६ हजार ७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६ हजार ५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९७.२९ टक्के लागला आहे.
          शिरूर तालुक्यातील श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे, श्री संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल मुखई, श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे,  न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव, श्री नागेश्वर विद्यालय निमोणे, न्यू इंग्लिश स्कूल धामारी, पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी,   श्री गुरुनाथ विद्यालय वडनेर, न्यू इंग्लिश स्कूल अण्णापूर, श्री कालिका माता विद्यालय वाघाळे, अभिनव विद्यालय सरदवाडी, तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी, कै.के.पी.गदादे विद्यालय तांदळी, न्यू इंग्लिश स्कूल उरळगाव, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू बुद्रुक, छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगाव बुद्रुक, जय मल्हार माध्यमिक विद्यालय चिंचोली मोराची, श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा, श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय चिंचणी, एकता विद्यालय करंजावने, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर,  पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभूळसर बुद्रुक, फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा, कै. रामराव गेनुजी पलांडे आश्रमशाळा मुखई, श्री पद्ममनी इंग्लिश स्कूल पाबळ, विजयमाला विद्यामंदिर शिरूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर, आर.एम.डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल कोंढापुरी, बालाजी माध्यमिक विद्यालय शिरूर, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, अक्षरधन गुरुकुल स्कूल रांजणगाव गणपती, अक्षरधन गुरुकुल स्कूल कारेगाव, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव, ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, ज्ञानवर्धिनी विद्यालय तळेगाव ढमढेरे, डी.ई.एस.इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर आदी ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
       तर इतर शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे :- विद्याधाम प्रशाला शिरूर (९९.७८), भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ (९५.९७), स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (९४.९७), मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती (९७.९२),  विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (९५.१२), छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई (९३.९६), न्यू इंग्लिश स्कूल मलठण (९३.६६), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा  (९१.३०), सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर (९१.११), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (९०.५२), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (९७.६९), विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई (९७.८४), न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई (९७.८२), श्री भैरवनाथ विद्यालय करडे (९७.२१), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (९८.८३), मा.बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी (९५.९०), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (९८.८०), महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे (९७.९१), विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी (९०.२४), जय मल्हार स्कूल जांबुत (९७.७६), शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (९९.३३),  विद्या विकास मंदिर करंदी (९९.०३), श्री सद्गुरू कृपा विद्यालय नागरगाव (९७.२२), माध्यमिक विद्यालय सणसवाडी (९८.३७), श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा निमगाव माळुंगी (९७.२९), न्यू इंग्लिश स्कूल पिंपळसूटी (९६),  मा.बापूसाहेब गावडे विद्यालय म्हसे बुद्रुक (९४.४४), हनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी (९५), आयेशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर (९०), श्री संतराज महाराज विद्यालय रांजणगाव सांडस (९६.२२),  श्री दामोदर ताटे विद्यालय कारेगाव (९५.१६), न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे (८९.३६), महाराज सयाजीराव गायकवाड विद्यालय पिंपळे जगताप (८९.४७), आदर्श विद्यालय वरुडे (९६.५५), बापूसाहेब गावडे विद्यालय चांडोह (९५.६५), समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय तळेगाव ढमढेरे (९९.२५), सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय कासारी (९७.२२), श्री घणोबा माध्यमिक विद्यालय धानोरे दरेकरवाडी (९३.३३), स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालय ढोक सांगवी (९८.३३), श्री दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट (७६.६६), श्री काळभैरवनाथ विद्यालय कोयाळी शिक्रापूर (९८.२१), आर.एम.धारीवाल विद्यालय गणेगाव (८६.९५), मा. पांडुरंगअण्णा थोरात विद्यालय आमदाबाद (८०), श्री शिवाजी विद्यालय गोरेगाव (९२.३०), जीवन विकास विद्यालय शिरूर (९६.९६).
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल शिरूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!