थकबाकी पोटी मालमत्ता सिल थकबाकीदारांची नावे फलकांवर प्रदर्शित करणार
शिरूर,प्रतिनिधी
शिरूर शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कर भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले असून, कर नभरणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे तर गाळा सिल करण्यात आले आहे.थकबाकी पोटी मालमत्ता सिल थकबाकीदारांची नावे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फलकाद्वारे प्रदर्शित करणार आहे.
आजपर्यंत नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता व पाणी कराच्या थकबाकी असणाऱ्या ६८ मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे तर एक गाळा सिल करण्यात आला आहे.
. यापुढे ही थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्तेची जप्तीची व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू ठेवली जाणार असून थकबाकी दारांची नावे शहरातील मुख्य चौकामध्ये लावण्यात येणार आहे. त्यामुळे कराचा भरणा करून नगरपरिषदे कडून करण्यात येणारी संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.
नगर परिषद चा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर दरवर्षी १ एप्रिल रोजी देय होतो तसेच पहिल्या सहा माहीपूर्वी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणे अनिवार्य आहे अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये थकीत रकमेवर दरमहा २ % व्याज आकारण्यात येते .
सर्व मिळकत धारकांना मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्यासाठी भ्रमणध्वनीवर 4 वेळेस कर भरणा करणे बाबत संदेश पाठवण्यात आले असून ,शहरात नगर परिषद च्या १० घंटा गाडी द्वारे दवंडी देखील देण्यात येत आहे.
नागरिकांच्या सोईसाठी कर भरणेकामी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार देखील नगपरिषद नविन प्रशासकीय इमारत येथील नागरी सुविधा केंद्र व तसेच जुनी नगरपरिषद येथेही अतिरिक्त वसूली केंद्र कार्यान्वित केलेले आहे. तसेच नागरिकांना घर बसल्या “Shirurnp.org” या संकेत स्थळांवर भेट देऊन करांचा भरणा करण्याची सुविधा परिषदे मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नळ कनेक्शन कट व गाळा सील करण्यासाठी शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदरील कार्यवाहीस अक्षय बनगीनवार, दिपक कोल्हे, मोहन गुरव, तेजस शिंदे,. अमृत भवर, भगवान आगोणे व इतर कार्यक्रमाचारी पथक करीत आहे.