शिक्रापूर मध्ये ३ शिरूर मध्ये १ अशा एकाच दिवसात चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे

9 Star News
0

 शिक्रापूर मध्ये ३ शिरूर मध्ये १ अशा एकाच दिवसात चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे


शिरूर ( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारे आत्म्हत्याच्या घटना घडत असताना वढू बुद्रुक, कोंढापुरी व शिक्रापूर शिरूर येथे एकाच दिवसात चार वेगवेगळ्या इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याआहेत .

    वढू बुद्रुक येथे मंगेश रंगनाथ भंडारे (वय ३७ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे), तर कोंढापुरी येथे गोविंद बोकरराव दुधारे (वय ६० वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गोळेगाव ता. पूर्णा जि. परभणी )आणि शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे विष्णू शेषराव चव्हाण (वय ४० वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेचखेडा ता. यवतमाळ जि. यवतमाळ) तर शिरूर येथे प्रदीप मधू पांढरे (वय २४ यशवंत कॉलनी शिरूर)या चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या मात्र कोणाच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नसून चौघा इसमांच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप मोरे हे करत आहे. तर शिरूर येथील घटनेचा तपास पोलीस पोलिस हवालदार खेडकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!