तरुण तरुणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या शिरूर रेव्हेन्यू कॉलनी ‘ द स्टीम रुम ‘या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल... कॅफे चालकाचे पोलिसांना आव्हान...

9 Star News
0
तरुण तरुणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या शिरूर रेव्हेन्यू कॉलनी ‘ द स्टीम रुम ‘या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल... कॅफे चालकाचे पोलिसांना आव्हान...
शिरुर, दिनांक ९ प्रतिनिधी 
शिरूर शहरातील तरुण -तरूणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या ‘ द स्टीम रुम ‘या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कॅफेच्या मालकावर या अगोदर गुन्हा दाखल झाला असताना त्यांनी पुन्हा हा कॅफे त्याच प्रकारे सुरू करून पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले होते.
        आकाश रमेश लभडे (वय २३ वर्ष रा. अरणगाव ,ता .श्रीगोंदा जि अहिल्यानगर) असे या कॅफे चालकाचे नाव आहे.
  याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुले मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी’ द स्टीम रुम ‘ या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन केले असुन त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती . त्यानुसार सदर कॅफेवर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते.
त्यानुसार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड हे साध्या वेशात शिरूर शहारामधील रेव्हेन्यु कॉलनी येथील या कॅफेमध्ये जावुन नाष्टा ऑर्डर देवुन बसले असताना तेथे काही मुले व मुली कॅफे चालकाने पार्टेशन केलेल्या रूममध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना आढळून आले .तसेच अजुन काही शाळकरी मुले व मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले . कॅफे चालक आकाश रमेश लभडे( वय २३ वर्ष रा. अरणगाव, ता .श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा भा. न्या .संहिता कायदा कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याबाबत पोलीस अमंलदार रविंद्र बापुराव आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करीत आहेत. 

चौकट-
      या कॅफे चालकाने पोलिसांना आव्हान देऊन
 कॅफेवर फेब्रुवारी महिन्यात यापुर्वी देखील शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वेळेत कॅफे त नाव तेच द स्टीम रुम कॅफे तरुण तरुणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा फक्त मालक वेगळा अशी शक्कल चालून पोलिसांना आव्हान दिले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!