गेल्या सहा महिन्यापासून ईडीच्या जेलमध्ये असणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व
आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल हे सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहेत त्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मंगलदास बांदल खळबळ उडून देणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, ईडीने २१ ऑगस्ट २०२४ रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी कारवाई करीत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते. तसेच बांदल यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मनीलॉडरींगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करण्यात आले होते.
यापूर्वीही शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यांपासून कारावास भोगत आहेत. आता जमीन मंजूर झाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्या दिनांक बारा मार्च सायंकाळी पर्यंत ते जेलमधून बाहेर येतील असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे. तर शिरूर तालुका हवेली तालुक्यामध्ये असणारे पैलवान मंगलदास बांदल यांचे समर्थक यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.
विधानसभा निवडणुकीनंतर मंगलदास बांदल यांचा जामीन होईल अशी चर्चा सर्वत्र होती. त्याप्रमाणे जामीन झाला आहे.