शिरूर (प्रतिनिधी )
रामलिंग महाराज की जय हर हर महादेवच्या जयघोषात.... शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराज यात्रेची सुरवात मोठ्या उत्साहात झाली असून, हजारो रामलिंग भक्तांनी भाविकांनी महाशिवरात्री निमित्त श्री रामलिंगाचे दर्शन घेतले.
श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते महाअभिषेक करून करण्यात आला व मुख्य यात्रेत सुरुवात झाली.
यावेळी लाखो भाविकानी आराध्य दैवत श्री रामलिंग महाराज यांच्या पिंडीचे दर्शन घेतले , महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रोत्सव साजरा करण्यात आला शिरुर शहर व पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी हर हर महादेव,रामलिंग महाराज की जयचा जय घोष करत प्रभु रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले.
या उत्सवानिमित्त शिरूर शहरातुन महाशिवरात्रीच्या
दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त शिरूर शहरातुन काढण्यात आलेली रामलिंग महाराज पालखीचे रामलिंग जुने शिरुरमंदिराकडे आज पहाटे प्रस्थान झाले.
महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजलेपासुनच जुने शिरूर येथील दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.उत्सव समितीच्यावतीने मंदिरास व परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर परिसर उजळुन निघाला होता तसेच रात्री शोभेची दारू कामासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर पंचक्रोशि च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला .
यावेळी ,रामलिंग देवस्थान चे खजिनदार पोपटराव दसगुडे,विश्वस्त गोदाजी घावटे ,वाल्मीकराव कुरुंदळे,रावसाहेब घावटे , बलदेवसिंग परदेशी ,जगन्नाथ पाचर्णे ,बबनराव कर्डिले ,दादापाटिल घावटे, माजी सरपंच अरुण घावटे ,नामदेव जाधव, रामलिंगचे सरपंच शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वर्पे, पंचक्रोशिचे नागरिक ,रामलिंग ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व रामलिंग ग्रामपंचायत यांनी यावेळी अतिशय शिस्तबद्धपणे यात्रेचे नियोजन केले असल्याचे दिसून आले .
शिरूर शहर रामलिंग रोडवर श्रीराम सेनेच्या वतीने आमदार माऊली कटके मित्र मंडळाच्या वतीने सुनिल जाधव, स्वप्निल रेड्डी मित्रपरिवार यांनी खिचडी वाटप तर अमोल लुनिया मित्र मंडळाच्या वतीने सर्वात व चहाचे वाटप, श्री हाईट शिरूर यांच्या वतीने १० हजार भक्तांना खिचडी व मठ्ठाचे वाटप, शिरूर मित्र मंडळाच्या वतीने, शिरूर शहरातील सर्वात रिक्षा संघटनांच्या वतीने , भाजपा युवा मोर्चाच्या वतीने, जाधव परिवार रामलिंग रोड यांच्या वतीने, पाण्याची बॉटल, केळी वेफर्स अशा विविध उपवासांच्या पदार्थांचे मोफत वाटप अनेक मित्र मडळाच्या वतीने सुरू होते.
. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले.शिरूर बस स्थानक आगाराच्या वतीने भाविकांसाठी जादा बस गाड्यांची सोय करण्यात आली होती तर शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उद्या सकाळी सात वाजल्यापासून रामलिंग बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतींचा थरार होणार.