कारेगाव ता. शिरुर येथील येथे महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडित महिलेने फिर्याद दिली आहे.
शिवाजी दत्तराव आंबोरे (सध्या रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे रा. अमानी ता. मालेगाव जि. वाशीम) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कारेगाव ता. शिरुर येथील एका महिलेची शिवाजी आंबोरे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर शिवाजी याने महिलेशी जवळीक निर्माण करत महिलेला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःसह त्याच्या एका मित्राच्या खोलीवर महिलेला बोलावून घेत महिलेवर अत्याचार केला, घडलेल्या या प्रकाराबाबत पिडीत महिलेने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी शिवाजी दत्तराव आंबोरे सध्या रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे रा. अमानी ता. मालेगाव जि. वाशीम याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे करत आहे.