शिक्रापूर ता.शिरूर येथील भाऊचा धक्का हॉटेल जवळ तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या तीन चोरट्यांपैकी दोघा चोरट्यांना पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेंच्या धडाकेबाज कारवाईची शिक्रापूर परिसरातून कौतुक होत आहे.
गणेश कैलास भोसले (वय १८ वर्षे रा.मावळेवाडी ता. पारनेर जि. आहिल्यानगर), अजय माणिक घेगडे (रा.राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर ) या दोघांना अटक करण्यात आली तर त्यांचा एक साथीदार फरार आहे.
याबाबत पायल संतोष लोहार (वय १९, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मुळ रा. पाडळोशी ता. पाटण जि. सातारा ) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २ फेब्रुवारी रोजी फिर्यादी पायल लोहार हे त्याचे वडीलांचा डब्बा घेवुन पायोनेर प्रा. लिमीटेड कंपनी कडे आहिल्यानगर ते पुणे हायवे रोडने पायी जात असताना शिक्रापुर हॉटेल भाऊचा धक्का येथे फिर्यादी यांचे पाठीमागुन २० ते २१ वर्षे वयाचा एक अनओळखी मुलगा आला त्याने चाकूचा धाक दाखवून फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन स्प्लेन्डर मोटारसायकलवर दोन साथीदारांबरोबर पळून गेला होता याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती.
या गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन असे करीत होते. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तंत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने गाहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा गणेश भोसले व अजय घेगडे व त्यांचा एक सहकारी यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरून नेलेला विवो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून जप्त केलेली मोटरसायकल ही आरोपींनी खराडी पुणे येथून चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.