शिरूरच्या सेंट जोसेफ व सरदवाडीच्या सेंट चावरा स्कूलमध्ये विद्यार्थी धर्मांतरांचा प्रयत्न होत असल्याचा भाजपचा संशय

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
        शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील 'सेंट चावरा स्कूल' आणि रामलिंग येथील 'सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल' ९० टक्के हिंदू विद्यार्थी असताना येथे विद्यार्थ्यांना एकाच धर्माचे प्रतिक निदर्शनास आणून विद्यार्थ्यांचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न याशाळा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या वतीने करून या शाळांवर कडक कारवाई करावी अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 
       याबाबतचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब मस्के, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर आणि शिरूर पोलीस निरिक्षक संदेश केंजळे (ठाणे अंमलदार जगताप) यांना देण्यात आले आहे.
       यावेळी भाजप मन की बात संयोजक तथा शिरूर तालुका भाजपचे सरचिटणीस विजय नरके, भाजपा कार्यकर्ते आकाश चाकणे, राजेंद्र महाजन, राजू चोंधे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
       याबाबत पालकांनी तक्रार केली होती त्या अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील 'सेंट चावरा स्कूल' आणि रामलिंग येथील 'सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल' येथे जाऊन पहाणी केली असता तेथे ख्रिस्ती धर्माचे प्रतीक क्रॉस आणि येशू ख्रिस्त, तसेच मदर मेरी अन् इतर सांकेतिक चिन्हे, तसेच मूर्ती, मंदिरे निदर्शनास आल्या.
    या शाळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू विद्यार्थी शिकत असतांना कोण्या एका धर्माचे प्रतीक विद्यार्थ्यांच्या सतत निदर्शनास येतील, अशा पद्धतीने जागोजागी लावून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याची घटना घडत आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार कुठल्याही शाळेमध्ये इतर छायाचित्रे निदर्शनास आलेली नाहीत. त्यामुळे या शाळांची येत्या ८ दिवसांच्या आत समक्ष स्थळ पहाणी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिरूर तालुका भाजपचे सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नरके यांनी दिली आहे.
     यावेळी भाजप विजय नरके, आकाश चाकणे, राजेंद्र महाजन, राजू चोंधे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
     याबाबत जिल्हा कार्यालय ( zilla office) कडून मार्गदर्शन घेऊ. त्यानंतर योग्य ती कारवाई करू . बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षण अधिकारी, शिरूर पंचायत समिती, शिरूर 
          शिरूर येथील सेंट जोसेफ शाळा व सरदवाडी येथील सेंट चावरा स्कूल येथे विद्यार्थ्यांना दुसऱ्या धर्मांमध्ये ओढण्याचे काम सुरू असून, सन व धार्मिक शिकवण दुसऱ्या धर्माची का ?हा हिंदू धर्मावर अन्याय आहे. पालकांनी ही बाब लक्षात आणली त्यामुळे पालकांची आभार. या शाळेंवर शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास  भाजपा पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तर पालकांनी आपला पाल्य दुसऱ्या धर्माचे शिक्षण घेत नाहीना याकडे लक्ष दिले पाहिजे.
        विजय नरके, सरचिटणीस भाजपा शिरूर तालुका 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!