प्रवीण शिशुपाल फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम हाती घेणार - फिरोज सय्यद
शिरूर प्रतिनिधी शिरूर नगरपरिषद मंगलकार्यालय येथे महा आरोग्य शिबीरात शिरूर शहर आणि तालुक्यातील सुमारे 1500 रुग्णांनी लाभ घेतला आहे.
जनरल आणि विविध ओपीडी मध्ये 750 रुग्णांची तपासणी व निदान करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
डोळ्यांचे नंबर तपासणी करीता 485 रुग्णांची तपासणी करून 355 रुग्णांना मोफत नंबर चे चश्मे देण्यात आले.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 52 रुग्णांची नोंदणी केली त्यापैकी 18 रुग्णांची यशस्वीरित्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
फाउंडेशनचे प्रमूख प्रविण शिशुपाल,अध्यक्ष फिरोज सय्यद व त्यांची कार्यवाहक समिती चे संतोष गव्हाणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, डॉ.प्रवीण गायकवाड रुस्तुम सय्यद, रवी लेंडे, अमोल यादव, निलेश जाधव, रियाज शेख, संदीप चव्हाण, बबलू सोनार, नाथा पाचर्णे, अशोक गुळादे, सागर घोलप,आनंद नितनवरे, प्रमोद गायकवाड, समाधान लोंढे, सागर घोलप, स्वप्नील माळवे, अबरार सय्यद, नगरसेवक विनोद भालेराव, प्रवीण गव्हाणे, आकाश साबळे, सतेश सरोदे, प्रशांत शिशुपाल, रमेश ईसवे व इतर पदाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबीराचे अतिशय सुरेख आयोजन केले होते.