संगीत खुर्ची... गाणी... सांस्कृतीक कार्यक्रम... आणि आलेल्या सुवासिनींना लेण हळद कुंकवाचा मान आणि सोबतीला वाण.... यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग.... आणि नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न ...
शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये हळदी कुंकू समारंभ व पालक मेळावा महिला पोलिस अधिकारी माधुरी झेडगे यांची उपस्थितीत महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिरूर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, डॉक्टर पूनम डफळ आणि नगरसेविका रोहिणी बनकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण व पालकत्व यावर मार्गदर्शनाने झाली. महिलांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका कशी बजवावी याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. तसेच, समुपदेशनाच्या माध्यमातून पालकांच्या शंका व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विविध खेळ,संगीत खुर्ची, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थित महिला पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. हळदी कुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमाने वातावरण अधिक उत्साही झाले.
या कार्यक्रमामुळे शिरूर नगर परिषद शाळा मध्ये प्रथमच महिला पालकांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळाली आणि शाळा व पालक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ झाले. शिरूर नगरपरिषद शाळा क्र. 1 च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्वांचे शिक्षिका प्रतिभा आहेर यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन संपदा राठोड, व सौ पडवळ,आभार मुख्याध्यापिका उषा वेताळ यांनी मानले.