न्हावरे ता. शिरूर येथे उपचारासाठी आलेल्या पेशंट महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाथकृपा हॉस्पिटलचे डॉक्टरला दोन वर्षाची व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए.झारी यांनी ठोठावली आहे.
डॉ. रामहरी भुजंगराव लाड (46 वर्षे राहणार न्हावरा तालुका -शिरूर जिल्हा -पुणे) असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
९ ऑगस्ट २० रोजी सकाळी डॉक्टर राम हरी लाड यांच्या नाथकृपा रुग्णालयात आलेल्या आजारी महिला पेशंटला ओ पी डी मधे बोलाऊन तिचे बरोबर डॉक्टर रामहरी लाड यांनी लगड करून अश्लील असभ्य व मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस एन मोठे यांनी केला होता. या गुन्ह्याची साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाब शिरूर न्यायालयाने घेतले असता न्यायालयाने सबळ पुरावा व साक्षीदार तपासून आरोपी डॉक्टर रामहरी लाड यांना दोन गुन्ह्यात वेगवेगळी दोन वर्षाची शिक्षा ठोकवली असून, ही शिक्षा एकत्र भोगायची असून,तीस हजार रुपयाचा दंडची शिक्षा शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए. झारी यांनी ठोठावली आहे.
या गुन्ह्याचे सरकारी वकील म्हणून माया शिवाजी शिरसागर जाधव यांनी काम पाहिले तर शिरूर पोलिस स्टेशनचे वतीने प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपासी पोलिस उपनिरीक्षक एस एन मोटे तपास केला.कोर्ट अंमलदार टी आर गोरे , महिला पोलिस अंमलदार एम एस फंड, पोलिस अंमलदार बाळकृष्ण वाडेकर, पोलिस अंमलदार प्रकाश वाघमारे, यांनी काम पाहिले.