प्रगतशील शेतकरी ऋषिकेश पवार यांची आदर्शवत शेती
( प्रतिनिधी ) शेतामध्ये काळजीपूर्वक व लक्ष देऊन काम केल्यास आणि वेगळे काहीतरी करण्याशी जिद्द ठेवल्यास यश नक्कीच मिळते हे शेतकऱ्याने दाखवून देत ३० गुंठे शेतीत चक्क १२५ क्विंटल बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेत शेतकऱ्यांपुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या ऋषिकेश पवार या प्रगतशील शेतकऱ्याने शेतात बटाटा पिक घेण्याचा निर्णय घेत नोव्हेंबर २०२४ मध्ये पुखराज बटाट्याचे वाण खरेदी करत आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने ३० गुंठे शेत क्षेत्रावर सरी काढून ८ क्विंटल इतकी लागवड केली. दरम्यान तज्ञांच्या सल्ल्याने आधुनिक पध्दतीने मशागत व इतर बाबी पूर्ण केल्या, सध्या नुकतेच बटाटा पिक काढण्यात आले असून ३० गुंठे शेतीतून तब्बल १२५ क्विंटल बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळाले असून, ऋषिकेश पवार यांना तीन महिन्यांमध्ये दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, दरम्यान जातेगाव बुद्रुक येथील आयडीबिआय बँकेचे व्यवस्थापक रुपेश भोईर यांनी सदर शेतीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून सदर शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
नव्या तंत्राने उत्पन्न वाढले - ऋषिकेश पवार ( प्रगतशील शेतकरी )
बटाटा काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असून आम्ही बटाटा काढण्यासाठी रेझर पद्धतीचा उपयोग केल्याने आम्हाला उत्पन्न जास्त झाले व नुकसान कमी झाले. त्यामुळे शेतकर्यांनी आधुनिक औषधी, वाण, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी असे आवाहन प्रगतशील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील ३० गुंठे शेतीतील बटाट्याचे विक्रमी उत्पादन दाखवताना शेतकरी व आदी.