( प्रतिनिधी ) शिक्षकांच्या कार्यामुळे गावामध्ये गावाने केलेला सन्मान हा हृदयस्पर्शी आणि सर्वात मोठा सर्वोच्च सन्मान असून त्या सन्मानाची तुलना आकाशा पेक्षा उंच वाटून जास्त वाटते तसेच या सन्मानामुळे शिक्षकांना काम करण्यात दहा हत्तीचे बळ मिळते असे गौरवोद्गार प्राचार्य अनिल साकोरे यांनी व्यक्त केले.
केंदूर ता. शिरुर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळेला शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेला तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळून दोन लाखांच्या बक्षिसास शाळा पात्र झाल्याने शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना प्राचार्य अनिल साकोरे बोलत होते, याप्रसंगी सरपंच प्रमोद पऱ्हाड, उपसरपंच शालन भोसुरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे विभागीय सदस्य राम साकोरे, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, अमोल थिटे, सुनिल थिटे सोसायटीचे चेअरमन अभिजित साकोरे, माजी उपसरपंच भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, मंगेश भालेकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश साकोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक श्रीहरी पऱ्हाड, ज्ञानेश्वर थिटे, बन्सी पऱ्हाड, बाळासाहेब साकोरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी सरपंच उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी शाळेचे कौतुक करत शाळा गुणात्मक व भौतिक दृष्ट्या परिपूर्ण झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून गावच्या विकासात शिक्षणाकडे जास्त प्राधान्य देणार असल्याचे सांगत विद्यालयासाठी लोकवर्गणीतून स्वच्छतागृह व प्रसाधनगृह उभारणार असल्याचे जाहीर केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राम साकोरे यांनी केले तर माजी उपसरपंच भरत साकोरे यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करताना पदाधिकारी व ग्रामस्थ.