शिरुर (प्रतिनिधी ) महायुती सरकारच्या काळात शिरूर तालुक्यातील तिन्ही नदीपात्रातून चोरून बेसुमार वाळू उपासा सुरू झाला असून राजकीय दबाव सुरु झाल्याने,महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला कुठली दाद हे वाळू माफिया देत नसल्याने याभागात कार्यवाहीसाठी जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या जीवीताला धोका होण्याची शक्यता आहे . वाळू माफियांवर कारवाई न करण्यासाठी राजकारणी यांचा दबाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राज्याचे महायुतीचे सरकार वाळू माफी यांना साथ देणार का? कडक कायदा करणार हे पाहणे गरजेचे आहे .
या अगोदर तत्कालीन आमदार यांनी शिरूर तालुक्यातील वाळू माफियांवर प्रशासनाच्या वतीने जरब बसवला होता. परंतु विधानसभा निवडणूक झाली तालुक्याचे आमदार बदलले आणि पुन्हा वाळू माफियांनी डोके वर काढून हैदोस सुरू केला आहे. आता आमचे राज्य आहे असे म्हणत खुलेआम फेसबुक इंस्टाग्राम यावर वाळूची जाहिरात करण्याचे धाडस ही वाळू माफिया करू लागले आहे.
शिरूर तालुक्यातील घोडनदी,कुकडीनदी ,भीमानदी ही तीन नदीपात्र असून गेल्या अनेक वर्षापासून या नदी पात्रावर वाळू माफियाचे राज्य आहे .राजकीय वरदहस्त व शासकीय अधिकारी यांच्याशी असलेली आर्थिकधोरण यामुळे पहिल्या टप्प्यात या वाळू माफिया यांनी याभागात आपले बस्थान बसवले यामुळे तत्कालीन अधिकारी व वाळू माफिया दोघे गब्बर झाले. वाळू माफियाकडे मुबलक पैसा आला आणि अत्याधुनिक यंत्र सामुग्रीची साह्याने बेसुमार अवैध वाळू उपसा करून त्याची चोरटि वहातूक रात्रीच्या अंधारात सुरू झाली एका रात्रीत लाखो रुपयांची वाळू काढली जात आहे आणि येणारा पैसा यामुळे अनेक वाळू चोर हे व्हाईट कॉलर पुढारी झालेले दिसत आहे .वाळू चोरी मुळे पैसा व त्यामुळे राजकीय वजन थोडे वाढले की यांना जोर येणारच !
शिरूर तालुक्यात ज्या वाळू चोराना महसुल अधिकारी यांनी हात दिला तो हात ओढून हात ऊगर्न्याचे काम यातालूक्यात झाले आहे एका तत्कालीन तहसीलदार यांच्या गाडीवर दगड फेक तर एका नायब तहसीलदार यांस बेदहम मारहाण ,तर एका तहसीलदार यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या सह अनेक घटना घडल्या आहेत .
नुकत्यात गुनाट येथे दोन वाळू चोरी करून त्याची वाहतूक करणाऱ्या पोलीस व महसूल प्रशासनाने पकडल्या परंतु या ट्रकच्या चाव्या देण्यास व महसूल पोलीस प्रशासनासमोर या वाळूमाफियाने ट्रक मधील वाळू ट्रॅक्टर मध्ये टाकण्यासाठी ट्रॅक्टर आणला होता एवढा मुजोर आणि प्रशासनाला न जुमानता हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे राजकीय दबाव व मुजोर वाळू माफिया यांचे काही चालले नाही. त्यानंतरही 14 तास वाळू ट्रक गुणाट मध्येच अडवून ठेवण्याचे काम या वाळू माफियाने केले हा प्रकार वाळू माफिया राजकीय दाबावशिवाय करू शकत नाही.
हा सगळा प्रकार म्हणजे वाळू माफिया मुजोर झाले असून पैसा व राजकारण यांच्या दोघांच्या संगणमत यामुळे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे यापुढे कार्यवहिला जाणाऱ्या महसुल कर्मचारी पथकाकडे पुरेसे संरक्षण नसेल तर त्याच्या जीवीतला धोका होईल अशी शक्यता आहे त्यामुळे पुढील काळात वाळू माफिया यांच्या साठी कडक कायदा व अजामीन पात्र गुन्हा व जलदगति न्यायालय मधे गुन्हे चालवले तर याला आळा बसेल परंतु त्यासाठी महसुल कर्मचारी यांनी तेवढेच सक्षम रहाणे गरजेचे आहे .