शिरूर
( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरूर येथे आठवडाभरा पासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असताना नुकतेच एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केलेला असताना वनविभागाने तातडीने त्याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
कोंढापुरी ता. शिरूर येथील ससेवस्ती परिसरातील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना नुकतेच राहुल गायकवाड यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला, याबाबतची माहिती नागरिकांनी शिरुर वनविभागाला दिल्यानंतर नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टिम मेंबर शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ यांनी दिपक गायकवाड, सतीश गायकवाड, राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत परिसरात पाहणी करत पिंजरा लावला आहे. तर नागरिकांनी रात्रीच्या सुमारास एकटे बाहेर पडू नये, शेतामध्ये जाताना मोठ्याने आवाज करत जावे, रात्रीच्या सुमारास लाईट चालू ठेवावी, शेतामध्ये जाताना एकटे जाऊ नये असे आवाहन देखील नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – कोंढापुरी ता. शिरूर येथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावताना वन विभागाचे अधिकारी व आदी.